विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांना दिलासा, अमेरिकेत होणार नाही प्रत्यार्पण

विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांचे अमेरिकेत प्रत्यार्पण केले जाणार नाही. ब्रिटीश कोर्टाने सोमवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. अमेरिकेची गुप्त कागदपत्रे आणि मुत्सद्दी संदेश सार्वजनिक करण्यासाठी अमेरिकेने असांजे यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. Consolation to WikiLeaks founder Julian Assange, extradition will not take place in US


विशेष प्रतिनिधी

लंडन : विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांचे अमेरिकेत प्रत्यार्पण केले जाणार नाही. ब्रिटीश कोर्टाने सोमवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. अमेरिकेची गुप्त कागदपत्रे आणि मुत्सद्दी संदेश सार्वजनिक करण्यासाठी अमेरिकेने असांजे यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. याबाबतच त्यांच्याविरुद्ध खटला सुरू होता. असांजे यांना यापूर्वी स्वीडनमधील बलात्कार प्रकरणात दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी असांजे यांनी अनेक वर्षे ब्रिटनमधील इक्वेडोरच्या दूतावासात घालविली.

सेंट्रल लंडनच्या डिस्ट्रिक्ट ओल्ड बॅले कोर्टाच्या न्यायाधीश व्हॅनिसा बॅरियेस्टर यांनी हा बहुप्रतीक्षित निर्णय दिला. न्यायाधीश म्हणाल्या की, ज्युलियन असांजे आत्महत्येसारखी घातक पावले उचलतील, अशी भीती आहे. प्रत्यर्पणाचा आदेश त्यांच्या मानसिक छळासारखा ठरू शकतो. न्यायाधीश म्हणाल्या, असांजे यांना अमेरिकेने ताब्यात घेतल्यास त्यांना कैदी म्हणून अत्यंत कठीण परिस्थितीतून जावे लागू शकते. त्यांचे सामाजिक संबंध संपुष्टात येतील. बाहेरील कोणाशीही संपर्क साधणे त्यांना कठीण होऊन जाईल.

हे प्रकरण बर्‍याच काळापासून आंतरराष्ट्रीय माध्यमात चर्चेत राहिले आहे. गुप्तचरांच्या कागदपत्रांची हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अमेरिकन सरकारला असांजेचा प्रत्यार्पण हवे होते. या प्रकरणात त्यांना मृत्युदंडसुद्धा ठोठावला गेला असता. विशेष म्हणजे अमेरिकी सरकार आणि दूतावासांमधील गुप्तचर संदेश उघड झाल्याने जगभरात खळबळ उडाली होती. त्याच वेळी अमेरिकन सरकारमध्येही वाद विकोपाला गेले होते. अमेरिकेवर मित्र देशांच्या नेत्यांची हेरगिरी केल्याचा आरोपदेखील होता.

Consolation to WikiLeaks founder Julian Assange, extradition will not take place in US

2010 मध्ये बलात्कार प्रकरणात स्वीडनच्या विनंतीवरून असांजे यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. दोन महिलांनी केलेल्या बलात्कार आणि लैंगिक छळाच्या आरोपावरून स्वीडिश सरकारला असांजे यांची चौकशी करायची होती. तथापि, स्वीडनमध्ये प्रत्यार्पण होऊ नये म्हणून असांजे यांनी 2012 मध्ये लंडनमधील इक्वेडोर दूतावासात आश्रय घेतला. एप्रिल 2019 मध्ये दूतावासातून बाहेर आल्यावर ब्रिटीश पोलिसांनी जामिनासह पळून जाण्याच्या आरोपाखाली अटक केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*