बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माच्या बहिणीशी एकमेकांच्या संमतीने संबंध; करूणा शर्मापासून धनंजय मुंडे यांना दोन मुले; फेसबुक पोस्टवरून प्रथमच मुंडेंची सार्वजनिक माहिती


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा हिची ओळख नसल्याचा किंवा काहीही संबंध नसल्याचा दावा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेला नाही. उलट रेणूची बहीण करूणा शर्मा हिच्याशी २००३ पासून एकमेकांच्या संमतीने संबंध होते. या संबंधांमधून एक मुलगा, एक मुलगी असल्याची कबुली सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून दिली आहे.Consensual relationship with Renu Sharma’s sister who accused him of rape

राज्याच्या राजकारणात खळबळ उडविणारे गंभीर आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यापूर्वी या प्रकरणाचा त्यांनी सार्वजनिक खुलासा केलेला नव्हता. बलात्काराचा गंभीर आरोप झाल्यानंतर मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून काही खुलासे केले आहेत.


धनंजय मुंडे यांच्या विरोधात तरूणीची बलात्काराची तक्रार; बड्या नेत्यांना ट्विट केली तक्रारीची कॉपी


यात प्रथम त्यांनी रेणू शर्मा नावाच्या महिलेस ओळखत नसल्याचा वगैरे दावा केलेला नाही. उलट त्यांनी रेणू शर्मा हिच्या बहिणीशी २००३ पासून एकमेकांच्या संमतीने संबंध असल्याचे स्पष्ट केले आहे. आपली पत्नी, अन्य कुटुंबीय तसेच काही मित्रमंडळी यांना हे संबंध आणि या संबंधांपासून झालेली दोन मुले यांची माहिती आहे. कुटुंबीयांनी या मुलांचा स्वीकार केला आहे. या मुलांना आपले पालक म्हणून नावही दिले आहे, असेही धनंजय मुंडे यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

रेणू शर्मा हिने केलेले बलात्काराचे आरोप धनंजय मुंडे यांनी फेटाळून लावले आहेत. तिने ब्लॅकमेल करण्यासाठीच आणि खंडणी गोळा करण्यासाठीच हे आरोप केल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. यात रेणू शर्माबरोबरच करूणा शर्मा तसेच तिचा भाऊ ब्रिजेश शर्मा यांचाही सहभाग आहे.

Consensual relationship with Renu Sharma’s sister who accused him of rape

त्यांना मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी मदत केली. आता ते बदनामी करत आहेत. ब्लॅकमेलही करीत आहेत. करूणा शर्माविरोधात न्यायालयात केस दाखल केली आहे. तिची सुनावणी सुरू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असेही मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था