नानांच्या पदग्रहण सोहळ्यात काँग्रेसचा सावळा गोंधळ ; रंगलं मानापमानाचं नाट्य अन दोस्त राष्ट्रवादीवर टीका

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांच्या पदग्रहण समारंभाच्या ठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यासह काँग्रेस प्रमुख नेते उपस्थितीत होते.स्टेजवर नुसता सावळा गोंधळ सुरु होता .सगळ्यांना स्टेजवर बसायचे होते .Congress’s shadow mess at Nana’s inauguration ceremony; Criticism of Rangalam Manapmanacha Natya An Dost NCP

यामुळे नवीन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना पदाधिकाऱ्यांना स्टेजवरुन खाली उतरवण्याची वेळ आली. 

त्यामुळे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पदग्रहण समारंभात मानापमान नाट्य पाहायला मिळालं. कोरोना काळात जास्त गर्दी करत सर्व नियंमांचे पायमल्ली केल्याचे पाहायला मिळालं. ना मास्क ना सामाजिक अंतर महाविकास आघाडीत मतमतांतर असं काहीसं रूप या सोहळ्यात पाहायला मिळालं.

राज्याच्या राजकारणात नाना पटोले यांच्या प्रवेशांनंतर मोठा बदल होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान नाना पटोलेंची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर राज्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकावर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

 

 

Congress’s shadow mess at Nana’s inauguration ceremony; Criticism of Rangalam Manapmanacha Natya An Dost NCP

अजित पवारांवर टीका

ईव्हीएमबाबत अजित पवार यांचे वेगळे मत आणि माझे मत वेगळे. मला ईव्हीएम नको मी तसं मत व्यक्त केले. अजित पवार वित्त मंत्री आहेत. चावी त्यांच्याकडे म्हणून सर्वच ऐकायचं असं कुठे आहे? असं म्हणतं नाना पटोले यांची अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*