राम मंदिरासाठी ११ कोटी कुटुंबांशी संपर्क अभियान; काँग्रेसचे यूपीत १० लाख कुटुंब जोडणी अभियान, प्रियांकांच्या फोटोंची १० लाख कॅलेंडर वाटणार


वृत्तसंस्था

लखनौ : राम मंदिरासाठी देशभर मकर सक्रांतीपासून माघ पौर्णिमेपर्यंत सुरू राहणाऱ्या निधी संकलन कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते चार लाख गावांच्या ११ कोटी कुटुंबीयांशी संपर्क साधत आहेत, तर उत्तर प्रदेशात २०२२ च्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या बूथ पॉलिटिक्सला प्रत्युत्तर देण्यासाठी कार्यपद्धतीत बदल केला आहे, तर काँग्रेसने नवीन ‌वर्षात आदिवासी आणि मागासवर्गीयांची मते वळवण्यासाठी “कॅलेंडर पॉलिटिक्स’ सुरू केले आहे. campaign sampark with 11 crore families for Ram Mandirकाँग्रेसने प्रियंका गांधी-वाड्रा यांचे सोनभद्र-हाथरसमधील पीडित कुटुंबांचे अश्रू पुसतानाच्या छायाचित्रांसह १० लाख कॅलेंडर घरोघरी वाटण्याची तयारी केली आहे.  बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी यापूर्वीच स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच सपा, बसपा आणि काँग्रेसकडून बूथ कमिट्या तयार केल्या जात आहेत. समाजवादी पक्षाकडून ग्रामीण भागांमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले जात आहेत.

काँग्रेसचे १० लाख कुटुंबांना जोडण्याचे ध्येय

“कॅलेंडर पॉलिटिक्स’च्या माध्यमातून काँग्रेस १० लाख कुटुंबाशी संपर्क साधणार आहे. प्रियंका गांधी-वाड्रा यांचे फोटो असणारे १० लाख कॅलेंडर काँग्रेसचे कार्यकर्ते गावागावांत आणि शहरांत वाटणार आहेत. प्रत्येक जिल्हा आणि शहर कमिटीसाठी कॅलेंडर दिले जात आहे. यात हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबाला भेटताना आणि पोलिसांच्या लाठीचार्जपासून कार्यकर्त्यांचा बचाव करतानाचे छायाचित्र लावण्यात आले आहे.

campaign sampark with 11 crore families for Ram Mandir

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था