कॉंग्रेसकडून राष्ट्रवादीची दुहेरी कोंडी करण्याचा प्रयत्न, रस्त्यावर नाना पटोले तर विधानसभेत पृथ्वीराज चव्हाण आणणार अडचणीत


लवासातील अनियमितता, राज्य सहकारी बॅंकेतील भ्रष्टाचारापासून ते सिंचन घोटाळ्यापर्यंत अनेक गैरव्यवहार बाहेर काढून मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसला पृथ्वीराज चव्हाण यांनी अडचणीत आणले होते. आता कॉग्रेस चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष म्हणून आणून राष्ट्रवादीची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे. तर नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष करून रस्त्यावरही राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे करणार आहे. Congress to confuse NCP Nana Patole on the streets while Prithviraj Chavan in the Assembly


विशेष प्रतिनिधी

मुंबई : लवासातील अनियमितता , राज्य सहकारी बॅंकेतील भ्रष्टाचारापासून ते सिंचन घोटाळ्यापर्यंत अनेक गैरव्यवहार बाहेर काढून मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसला पृथ्वीराज चव्हाण यांनी अडचणीत आणले होते. आता कॉंग्रेस चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष म्हणून आणून राष्ट्रवादीची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे. तर नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष करून रस्त्यावरही राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे करणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीला नियंत्रणात ठेवले होते. त्यामुळे चिडून जाऊन शरद पवार यांनी फाईलींवर सही करताना हाताला लकवा भरतो का, असा सवाल केला होता. तेच चव्हाण आता विधानसभेत राष्ट्रवादीला आणि विशेषत: अजित पवार यांना अडचणीत आणू शकतात.


नानांच्या प्रदेशाध्यक्षपदाची अजून नुसती चर्चाच; काँग्रेसला स्वबळावर सत्तेवर आणण्याची नानांची भाषा


अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी उरकल्यानंतर महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पवार-फडणवीस यांनी २४ तासांत अन् आवाजी मतदानाने सरकारचे बळ दाखवावे असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. परिणामी, फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा दिला होता.

न्यायालयातील लढाईचे नेतृत्व तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. मात्र सरकारमध्ये चव्हाण यांनी मंत्रिपद नाकारले होते. त्यामुळे चव्हाण यांचे पुनर्वसन पक्षाला करायचे होते. राष्ट्रवादीचा चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष करण्यास विरोध आहे.

दुसऱ्या बाजुला नाना पटोले हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. प्रदेशाध्यक्ष होण्याअगोदरच त्यांनी राज्यात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असे सांगितले होते. स्बळावरील सत्तेच्या प्रयत्नाचा सगळ्यात मोठा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसू शकतो. याचे कारण म्हणजे विदर्भात पाय पसरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात कॉंग्रेसची अनेक पॉकेटस आहेत. तेथील नेत्यांनाही पटोले यांच्यामुळे राष्ट्रवादीविरोधात लढण्यास ताकद मिळू शकते.

पुणे जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, कॉंग्रेसला चांगले दिवस आणायचे असतील तर पहिली लढाई ही राष्ट्रवादीच्या विरोधातच लढावी लागणार आहे. चव्हाण आणि पटोले यांच्यासारखे नेते कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताकद देतील.

Congress to confuse NCP Nana Patole on the streets while Prithviraj Chavan in the Assembly

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था