कॉंग्रेसनेच अहंकारातून शेतकऱ्यांना भडकावले, प्रकाश जावडेकर यांचा आरोप


भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि यश वाढत आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्टांची लोकप्रियता आणि यश घटत आहे. त्यांना राजकीय घराण्यांची चिंता आहे. लोकांनी त्यांना नाकारलं आहे. मात्र, तीच काँग्रेस अहंकाराने लोकांना भडकवण्याचं काम करत आहे, असा आरोप माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. Congress that provoked the farmers out of ego alleges Prakash Javadekar


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि यश वाढत आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्टांची लोकप्रियता आणि यश घटत आहे. त्यांना राजकीय घराण्यांची चिंता आहे. लोकांनी त्यांना नाकारलं आहे. मात्र, तीच काँग्रेस अहंकारात लोकांना भडकवण्याचं काम करत आहे, असा आरोप माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

जावडेकर म्हणाले की, काल दिल्ली पोलिसांनी अद्भूत संयम दाखवला. त्यांच्याजवळ शस्त्रे होती. मात्र, त्यांनी ती चालवली नाहीत. तलवारीने, काठ्यांनी प्रहार झाले तरीही पोलिसांनी संयम दाखवलं. हे निश्चितच प्रशंसनीय काम आहे. सरकारने तर दहा वेळा चर्चा केलीय. वर्ष-दीड वर्ष कायदा थांबवण्याची आणि स्थगित करण्याची तयारी दाखवली आहे.या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे कोणते अधिकार कमी झाले आहेत? एमएसपी, मंडी, मालकी हक्क कशालाही ठेच लागलेली नाही. उलट या कायद्यांमधून शेतकऱ्यांना पर्याय सुचवण्याचा मार्ग आहे. काँग्रेसलाही या गोष्टी माहिती आहेत. मात्र, काँग्रेसला ते होऊ द्यायचं नाही.

निवडणुकीत जे पराभूत झाले आहेत ते देशभरात एकत्र येऊन देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. २६ जानेवारीला काँग्रेस अशाप्रकारे शेतकऱ्यांना भडकवू शकते, यावरुन काँग्रेस कोणत्या थरावर आली आहे, त्याचं हे उदाहरण आहे. काँग्रेसच्या भडकवण्याच्या या राजकारणाला लोक नक्की उत्तर देतील. पंजाबमध्ये त्यांचं सरकार असताना हा सर्व प्रकार घडला आहे. काँग्रेसच्या अशा राजनीतीचा आम्ही निषेध करतो. जनताच त्याला योग्य उत्तर देणार आहे. याआधी त्यांनी सीएए कायद्यावेळी असाच प्रयत्न केला होता, असा आरोप जावडेकर यांनी केला आहे.

Congress that provoked the farmers out of ego alleges Prakash Javadekar

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था