चूल पेटवली, डान्स झाला, उंटावर चढले, आता गॅस सिलिंडरवर बसले!!; काँग्रेसी आंदोलन पुच्छ प्रगतीचेच ठरले!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसचे काय चाललेय तेच समजत नाही… सगळा भारत आधुनिकतेची कास धरत असताना काँग्रेस पक्ष पुच्छ प्रगतीचे प्रयोग करीत मागे का चाललाय?, ते समजत नाही. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने जेवढी आंदोलने केलीत, ती सगळी पुरोगामी नव्हे, तर प्रतिगामी स्वरूपाची ठरलीत. Congress’ Supriya Shrinate and Vineet Punia sit on gas cylinders as they address the media over rise in fuel prices.

त्यात आज एका आंदोलनाची भर पडली. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी काँग्रेस मुख्यालयात गॅस सिलिंडरवर बसून प्रेस कॉन्फरन्स घेतली… बरे नाही, पत्रकारांनाही खुर्च्यांऐवजी गॅस सिलिंडरवर बसवले… आधीच बरेच पत्रकार नोकऱ्या गमावण्याच्या गॅसवर बसले आहेत, त्यात काँग्रेसवाल्यांनी गॅस सिलिंडरवर बसविण्याची भीती होती. पण प्रेस कॉन्फरन्समध्ये फक्त काँग्रेसचे प्रवक्ते सुप्रिया श्रीनेत आणि विनीत पुनिया हेच फक्त गॅस सिलिंडरवर बसलेले आढळले. पत्रकारांना बसायला खुर्च्या देण्यात आल्याचे दिसले.अर्थात काँग्रेस नेत्यांना हे आंदोलन कितीही अभिनव वाटले, तरी ते प्रतिगामीच ठरले. किंबहुना आधीच्या प्रतिगामी आंदोलनांचा तो वाढावा ठरला. इंधनदरवाढी विरोधात गोव्यात काँग्रेसच्या महिला नेत्यांनी रस्त्यावर चुली पेटवून पुऱ्या तळल्या.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी झारखंडच्या सरायकेला – खरसांवा जिल्ह्यात शेतकरी आक्रोश रॅलीत काँग्रेसच्या नेत्यांनी पोरी नाचविल्या. लैला ओ लैला या धुंद करणाऱ्या गाण्यावर म्हणे राज्याचे मंत्री आलमगीर आलम पोरींबरोबर थिरकले… पोरी नाचविल्याचा विडिओ तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

गोव्यात चुली पेटवून झाल्या… झारखंडमध्ये पोरी नाचवून झाल्या… त्यांच्या पुढे जाऊन आंध्रातले काँग्रेस नेते उंटावर चढून बसल्याचे दिसले. आंध्र प्रदेशचे काँग्रेस नेते राजमुंद्रीचे माजी खासदार जी. व्ही. हर्षकुमार यांनी उंटावर चढून बसून इंधन दरवाढीविरोधातील अभिनव आंदोलन केले. राजमुंद्रीतील आपल्या घरापासून ते राजीव गांधी इन्स्टिट्यूटपर्यंत हर्षकुमार उंटावर बसून गेले. त्यांचा हा विडिओ देखील सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाला.  आज त्याचीही पुढची पायरी गाठत काँग्रेसचे प्रवक्ते गॅस सिलिंडरवर बसले. आंदोलनाचे एक वर्तुळ आजच्या पुरते पूर्ण झाले.

स्मार्ट ममतांचे इलेक्ट्रीक स्कुटीवर बसून आंदोलन

काँग्रेस नेत्यांच्या मानाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बऱ्याच स्मार्ट निघाल्या. त्यांनी इलेक्ट्रीक स्कुटरवर बसून इंधन दरवाढीविरोधातले आंदोलन केले. घरापासून ते मंत्रालयापर्यंत त्या इलेक्ट्रीक स्कुटीवर मागे बसून गेल्या.

एक प्रकारे जनतेने पर्यायी इंधनाचा वापर करावा, असेच ममतांनी आपल्या आंदोलनातून जनतेला सूचविले. काँग्रेसच्या कोणत्याही आंदोलनात असा अभिनव प्रकार दिसलाच नाही. उलट त्यांच्या आंदोलनाचे पवित्रे जुनाट १९७० – ८० च्या दशकातलेच निघाले.

Congress’ Supriya Shrinate and Vineet Punia sit on gas cylinders as they address the media over rise in fuel prices.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*