Congress struggles for survival, friendship with the Left in Bengal, while wrestling continues in Kerala

काँग्रेसचा अस्तित्वासाठी संघर्ष, बंगालमध्ये डाव्यांसोबत दोस्ती, तर केरळात कुस्ती सुरू

निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांना तडजोड ही नित्याची बाब आहे. परंतु काँग्रेसला आपल्या अस्तित्वासाठी तडजोडीपेक्षा मजबुरीच जास्त स्वीकारावी लागत असल्याचे दिसून येत आहे. केरळात सत्ताधारी डाव्यांशी काँग्रेस थेट लढाई करत आहे, तर पश्चिम बंगालमध्ये ममतांशी मुकाबला करण्यासाठी काँग्रेसने डाव्यांनाच आपले सारथ्य सोपवले आहे. गंमत म्हणजे, राष्ट्रीय स्तरावर भाजपशी लढण्यासाठी काँग्रेसने आतापर्यंत तृणमूल आणि डाव्यांचाच आधार घेतलेला आहे. पुदुचेरीत सरकार पडल्यानंतर आता दक्षिणेत काँग्रेसचा नामोनिशाण शिल्लक राहिलेला नाही. यामुळे केरळातील निवडणूक राहुल गांधींनी प्रतिष्ठेची केलेली आहे. Congress struggles for survival, friendship with the Left in Bengal, while wrestling continues in Kerala


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांना तडजोड ही नित्याची बाब आहे. परंतु काँग्रेसला आपल्या अस्तित्वासाठी तडजोडीपेक्षा मजबुरीच जास्त स्वीकारावी लागत असल्याचे दिसून येत आहे. केरळात सत्ताधारी डाव्यांशी काँग्रेस थेट लढाई करत आहे, तर पश्चिम बंगालमध्ये ममतांशी मुकाबला करण्यासाठी काँग्रेसने डाव्यांनाच आपले सारथ्य सोपवले आहे. गंमत म्हणजे, राष्ट्रीय स्तरावर भाजपशी लढण्यासाठी काँग्रेसने आतापर्यंत तृणमूल आणि डाव्यांचाच आधार घेतलेला आहे. पुदुचेरीत सरकार पडल्यानंतर आता दक्षिणेत काँग्रेसचा नामोनिशाण शिल्लक राहिलेला नाही. यामुळे केरळातील निवडणूक राहुल गांधींनी प्रतिष्ठेची केलेली आहे.

देशाच्या पाच राज्यांत लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी वेगवेगळे डावपेच आखायला केव्हाच सुरुवात केली आहे. बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला भिडण्यासाठी काँग्रेसने डाव्यांशी आघाडी केलेली आहे. तर केरळमध्ये काँग्रेसप्रणीत युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (यूडीएफ)ने सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट (एलडीएफ) च्या विरोधात दंड थोपटले आहेत. महाराष्ट्रातही काँग्रेसने अशीच मजबुरी स्वीकारली आहे. धर्मनिरपेक्षतेचे ढोल बडवणाऱ्या काँग्रेसने येथे हिंदुत्ववादी पक्षासोबत हातमिळवणी करत अनैसर्गिक युती करून देशभरातून आपले समर्थन गमावले आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी देशभरात काँग्रेसचा केविलवाणा संघर्ष सुरू असल्याचे दिसून येते.बंगालमध्ये डाव्या पक्षांना सोबत घेण्याची अपरिहार्यता काँग्रेसपुढे आहे. तर केरळमध्ये मात्र डाव्यांना आव्हान देण्यात आले आहे. केरळमधील काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, तेथे त्यांना डाव्या पक्षांना लक्ष्य करावे लागत आहे. तर बंगालमध्ये डाव्या पक्षांना सोबत घेऊन काँग्रेसला निवडणुकीत आपली प्रतिष्ठा वाचवण्याची कवायत करावी लागत आहे. केंद्रात कॉंग्रेस बर्‍याच दिवसांपासून डाव्यांना सोबत घेतलेले आहे. याच कारणामुळे केरळमधील कॉंग्रेसचे नेते डाव्यांना लक्ष्य करण्याचे थेट टाळत आहेत. येथे कॉंग्रेस सकारात्मक रणनीती घेऊन आपल्या सरकारच्या कारभारावर आधारित मते मागत आहे. केरळ दौऱ्यात कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी केवळ केंद्र सरकारशी संबंधित प्रश्नच उपस्थित केले. दुसरीकडे, पश्चिम बंगालचे प्रभारी जितीन प्रसाद म्हणतात की, राज्यातील पक्षाच्या नेत्यांच्या मागणीनंतरच पक्षनेतृत्वाने राज्यात डाव्या पक्षांसह निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

डाव्यांसोबत मिळून काँग्रेसचे मिशन बंगाल हेच दर्शवते की, आपल्या अस्तित्वासाठी रक्षणासाठी त्यांनी आपली मूळ विचारधारा बाजूला ठेवली आहे. परंतु यामुळे काँग्रेस आणखी दुबळीच होण्याची शक्यता जास्त आहे. डाव्यांसोबत कॉंग्रेसची युती केवळ डाव्या विचारसरणीकडे त्यांचा कल दर्शवत असून यामुळे हा पक्ष देशात आपले महत्त्व गमावतोय, यावरच शिक्कामोर्तब होते. एकेकाळी डाव्या पक्षांचा प्रभाव बंगाल आणि केरळसमवेत त्रिपुरामध्येही होता, परंतु आता ते केवळ केरळमध्येच मर्यादित राहिले आहेत. असे असूनही डाव्या पक्षांसमवेत उभे राहून कॉंग्रेस आपले नशीब आजमावू पाहत आहे. यावरून काँग्रेसचे जहाज दिशाहीन झाल्याचेच प्रतिबिंबित होत आहे.

Congress struggles for survival, friendship with the Left in Bengal, while wrestling continues in Kerala

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*