काँग्रेसमध्ये प्रदेश पातळीवर लोकशाहीचे पालन? प्रदेशाध्यक्ष प्रदेश प्रतिनिधीच निवडणार?; ५५७ प्रतिनिधींना ३ पर्याय निवडण्याची मूभा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये नेता निवडीत हायकमांडचे वर्षानुवर्षे वर्चस्व राहिले असताना प्रदेश पातळीवर आता लोकशाही मार्गाने प्रदेशाध्यक्षांची निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांच्या निवडीसाठी ५५७ प्रदेश प्रतिनिधींना डिजिटली मतदान करून तीन पर्याय निवडायला सांगण्यात आले आहेत.  congress state representvies will choose 3 optional names for state presidentship

बाळासाहेब थोरातांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखविल्यानंतर खांदेपालट होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी तीन नाव सूचवा, असे आवाहन प्रदेश काँग्रेस प्रतिनिधींना करण्यात आले आहे. एचके पाटील यांच्या आवाजात सर्व नेत्यांना एक डिजिटल कॉल जात आहे. काँग्रेसच्या शक्ती ॲप द्वारे हे डिजिटल मतदान घेतले जात आहे. दोन दिवस मंथन केल्यानंतर आता डिजिटल मत घेण्याचीही तयारी सुरू झाली आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी महाराष्ट्रात येऊन काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांचा कल जाणून घेतला होता. आता एचके पाटील यांच्या आवाजात सर्व नेत्यांना एक डिजिटल कॉल जात आहे. काँग्रेसच्या शक्ती ॲपद्वारे हे डिजिटल मतदान घेतले जात आहे. महाराष्ट्रात ५५७ प्रदेश प्रतिनिधी आहेत. प्रत्येकाला पसंतीक्रमानुसार मत नोंदवायला सांगितले आहे.

काँग्रेसच्या घटनेनुसार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य मतदानाद्वारे करतात. त्यांना काँग्रेस कार्यकारिणीचेही सदस्य निवडायचा अधिकार आहे. परंतु, पक्षात कित्येक वर्षे या पद्धतीचा अवलंब करण्याऐवजी सर्व पातळ्यांवरच्या नियुक्त्या करण्याचे अधिकार पक्षश्रेष्ठींना देण्याचे ठराव मंजूर करण्याचा पायंडा पडला आहे.

congress state representvies will choose 3 optional names for state presidentship

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश पातळीवर प्रदेशाध्यक्षपदासाठी तीन नेत्यांची नावे प्रदेश प्रतिनिधींना निवडायला सांगणे हे लोकशाही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासारखे आहे. प्रदेश प्रतिनिधींनी निवडलेल्या तीन पर्यायी नावांपैकी एकाचे नाव पक्षश्रेष्ठी निश्चित करतील.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*