‘ देशमुख देशाचे मुख होऊ शकत नाहीत’ : काँग्रेसनं महाराष्ट्र सरकारमधील पाठिंबा काढून घ्यायला हवा, दिग्विजय सिंहांच्या भावाची मागणी

दिग्विजय सिंह यांचे भाऊ लक्ष्मण सिंह यांनी याप्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोप पाहता काँग्रेसनं महाविकास आघाडीतील आपलं समर्थन काढून घ्यायला हवं, अशी मागणी त्यांनी केली आहे. Congress should withdraw support from Maharashtra government, demands of Digvijay Singh’s brother


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकार चांगलच गोत्यात आलं आहे. अशात आता मध्य प्रदेशमधील काँग्रेस आमदार आणि वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे भाऊ लक्ष्मण सिंह यांनीदेखील याप्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोप खरे असल्यास काँग्रेसनं महाविकास आघाडीतील आपलं समर्थन काढून घ्यायला हवं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लक्ष्मण सिंह यांनी ट्वीट करत म्हटलं, की महाराष्ट्राचे गृहमंत्री मुंबई पोलिसांकडून जर 100 कोटी रुपये प्रतिमहिना याप्रमाणं वसूल करत असतील आणि जर हे सत्य असेल तर देशमुख देशाचे मुख होऊ शकत नाहीत. असं दिसत आहे, की आघाडी सरकार पिछाडीवर जात आहे. काँग्रेसनं आपलं समर्थन माघारी घ्यायला हवं.अनिल देशमुखांवर सर्वच स्तरांमधून टीका होत असताना त्यांना स्वपक्षाकडून दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं, की महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख बदलले जाणार नाहीत. त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या घरी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक पार पडली. यात काँग्रेसच्यावतीनं कमलनाथ सहभागी झाले होते. या बैठकीनंतर जयंत पाटील म्हणाले, की गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची गरज नाही.

Congress should withdraw support from Maharashtra government, demands of Digvijay Singh’s brother

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*