मुंबई महापालिकेत कॉंग्रेस- शिवसेना वाद विकोपाला; कॉंग्रेस नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची शिवसेनेची तयारी


मुंबई महापालिकेत शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद विकोपाला पोहोचला आहे. कॉंग्रेसच्या नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. Congress-Shiv Sena Conflict Incresed in Mumbai Municipal Corporation


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद विकोपाला पोहोचला आहे. कॉंग्रेसच्या नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची तयारी शिवसेनेने केली आहे.

मुंबई महापालिकेच्या चिटणीस विभागानं विविध पक्षातील सात नगरसेवकांना पत्र पाठवलं आहे. त्यावरुन चिटणीस विभागाला हाताशी धरुन पालिकेत काँग्रेसला अडचणीत आणले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.काँग्रेस नगरसेविका कमरजहाँ सिद्दिकी यांनी वैयक्तिक कामासाठी 21 नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान रजा घेतली होती. महापालिकेच्या 27 ऑक्टोबरच्या सर्वसाधारण सभेस सिद्दिकी हजर होत्या. त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर सभांना त्या हजर नव्हत्या. त्यामुळे 5 जानेवारीला पार पडलेल्या सभेला अनुपस्थित राहिल्यास अपात्र ठराल, असं पत्र चिटणीस विभागाने सिद्दिकी यांना पाठवलं होतं. शिवसेना असे प्रकार मुद्दामहून करत असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे.

Congress-Shiv Sena Conflict Incresed in Mumbai Municipal Corporation

काँग्रेसचा हा आरोप म्हणजे फक्त विरोधासाठी विरोध असल्याचं प्रत्युत्तर स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिलं आहे. अशी स्मरणपत्र शिवसेनेसह अन्य पक्षातील नगरसेवकांनाही पाठवली गेली आहेत. पालिकेत काँग्रेस पक्ष भाजपच्या दावणीला बांधला जात असल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. शिवसेनेचे 2, काँग्रेसचे 2 तर भाजपच्या 3 नगरसेवकांना स्मरणपत्र दिले आहेत. यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही जाधव यांनी म्हटलंय.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था