औरंगजेबाबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला एवढं प्रेम का?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : औरंगाबादचे नामांतर ह्या मुद्द्यावर राजकारण पेटले आहे. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील नामकरणास विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी, ‘नामांतराचा प्रस्ताव आम्ही २० वर्षांपूर्वीच नाकारला होता. Congress-NCP so much in love with Aurangzeb?

नाव बदलण्याने शहराचा विकास होतो असे आम्हाला नाही वाटत.’ तसेच, ‘नाव बदलणे हे आमच्या अजेंड्यात नसल्याचे’ मलिक यांनी सांगितले आहे. त्यांनी थोरातांनी किमान समान कार्यक्रमाची शिवसेनेला आठवण करून देण्याचे एकप्रकारे समर्थनच केले आहे. यासंदर्भात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया;‘औरंगाबादचं संभाजीनगर व्हावं यात दुमत नाहीच. मात्र, गेल्या ३२ वर्षापासून शिवसेनेकडून नामकरणाचं राजकारण केलं जातंय. आता देखील येणाऱ्या महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही मागणी शिवसेनेनं केली आहे. सत्ताकाळात त्यांनी केलेल्या कामाबद्दल काहीही सांगण्यासारखं नाही.’ असा घणाघात त्यांनी केला.

Congress-NCP so much in love with Aurangzeb?

‘औरंगाबादमध्ये आजही १२० तासांनंतर पिण्याचं पाणी येतं. रस्त्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी काँग्रेस-शिवसेनेनं स्वतःमध्ये कुस्ती लावली आहे. ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना त्रास दिला. त्या औरंगजेबाबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला एवढं प्रेम का? याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं’ अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*