सिंघू बॉर्डरवरील जन संसदेत कॉंग्रेस खासदाराला मारहाण


सिंघू बॉर्डरवरील जनसंसद कार्यक्रमात कॉंग्रेसचे खासदार रणवितसिंग बिट्टू यांना मारहाण करण्यात आली. त्यांना शेतक्यांनी धक्काबुक्की केली. सिंघू बॉर्डरवरील जन संसद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बिट्टू आले होते. Congress MP beaten up in Parliament on Singhu border


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सिंघू बॉर्डरवर सुरू असलेल्या जनसंसद कार्यक्रमात कॉंग्रेसचे खासदार रणवितसिंग बिट्टू यांना मारहाण करण्यात आली. त्यांना शेतकऱ्यांनी धक्काबुक्की केली.

सिंघू बॉर्डरवरील जन संसद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बिट्टू आले होते. त्यांच्यासोबत कॉंगेसचे अमृतसरचे खासदार गुरजित सिंग अहुजा आणि आमदार कुलबीर सिंग झिरा हे देखील होते. या वेळी काही शेतकऱ्यांनी त्यांना मारहाण केली. त्यांची पगडी उडविली. त्याचबरोबर गाडीचीही मोडतोड केली.कॉंग्रेसने या प्रकाराला खुनी हल्ला असे म्हटले आहे. बिट्टू यांनी याबाबत म्हटले आहे की काही समाजविघातक घटकांनी आमच्यावर हल्ला केला. वातावरण बिघडविण्यासाठीच हा प्रकार घडविला गेला असावा. बिट्टू हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू आहेत. बेअंत सिंग यांची १९९५ मध्ये हत्या झाली होती.


अहुजा आणि झिरा हे गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे कृषि कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करत आहेत. बिट्टू यांनी दिलेल्या माहितीनुसार काही जणांनी त्यांच्यावर खुनी हल्ला केला. आंदोलक जमावाने त्यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढविला. त्यांच्या मोटरीचीही मोडतोड केली.  

Congress MP beaten up in Parliament on Singhu border

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती