काँग्रेसचे मंत्री हायकमांडसमोर झाले परखड; शिवसेनेला किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देण्याचा आग्रह


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – ठाकरे – पवार सरकारमध्ये सामील झालेले काँग्रेसचे मंत्री हायकमांडसमोर परखड झाले. त्यांनी मोकळेपणाने काँग्रेसच्या मंत्र्यांची ठाकरे – पवार सरकारमध्ये होत असलेली कुचंबणा मांडली. त्याच बरोबर शिवसेनेला महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाची आठवण करवून देण्याची गरजही त्यांनी हायकमांडकडे व्यक्त केली.Congress minister appeared before the High Command Urge Shiv Sena

ठाकरे – पवार सरकारमध्ये काम करताना काँग्रेसच्या मंत्र्यांना अडचणी येतात. अधिकारी नियुक्त्यांचे अधिकार काँग्रेसच्या मंत्र्यांना नाहीत. काँग्रेसच्या मंत्र्यांचे ऐकले जात नाही. काँग्रेसच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांना पुरेसा निधी देण्यात येत नाही. याकडे मंत्र्यांनी पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधले. वास्तविक निधी न मिळण्याची तक्रार ठाकरे – पवार सरकार स्थापन झाल्यापासूनची आहे.सरकार स्थापन होऊन एक वर्ष उलटून गेले तरी त्या प्रश्नाची त़ड लावली जात नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचे आणि अर्थ खाते उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे. त्यातून काँग्रेसच्या मंत्र्यांची कोंडी केली जाते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

शिवाय औरंगबाद, उस्मानाबाद शहरांच्या नामांतरासारखे भावनिक मुद्दे शिवसेना रेटून पुढे नेते. मुख्यमंत्र्यांच्या सरकारी ट्विटर हँडलवरून संभाजीनगर – धाराशिव असा उल्लेख केला जातो. यावर काँग्रेस मंत्र्यांनी आक्षेप घेऊनही मुख्यमंत्र्य़ांना काही फरक पडत नाही. म्हणूनच शिवसेनेला महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाची आठवण करवून द्यावी,

अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या मंत्र्यांनी हायकमांडपुढे मांडली. तत्पूर्वी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी आपापल्या मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयांची माहिती  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिली. 

Congress minister appeared before the High Command Urge Shiv Sena

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था