मोदी सरकारवर टीका करण्यासाठी कॉंग्रेसचा खोटेपणा, चीनच्या भारतातील गुंतवणुकीचे खोटे आकडे दाखविले


मोदी सरकारवर टीका करण्यासाठी कॉंग्रेस सातत्याने खोटे आरोप करत आहेत. चीनच्या भारतातील गुंतवणुकीबाबतही असेच खोटे आकडे कॉंग्रेसने दिले आहेत. मात्र, त्यांचा खोटेपणाही पकडला गेला आहे. Congress lies to criticize Modi government


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मोदी सरकारवर टीका करण्यासाठी कॉंग्रेस सातत्याने खोटे आरोप करत आहेत. चीनच्या भारतातील गुंतवणुकीबाबतही असेच खोटे आकडे कॉंग्रेसने दिले आहेत. मात्र, त्यांचा खोटेपणाही पकडला गेला आहे. Congress lies to criticize Modi government

कॉंग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवूून एक इन्फोग्राफिक प्रसिध्द केली आहे. यानुसार चीनची भारतातील थेट परदेशी गुंतवणूक वाढली असल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेसने यामध्ये म्हटले आहे की २०१७ साली चीनची भारतात २.९ बिलीयन डॉलर्स गुंतवणूक होती. २०१८ मध्ये ती वाढून ३.९४ तर २०१९ मध्ये ४.१९ बिलीयन डॉलर्स झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात चीनची गुंतवणूक वाढली असल्याचे सांगाताना कॉंग्रेसने आपल्या काळातील गुंतवणुकीचे आकडेही दिले आहेत. यामध्ये दाखविण्यात आले आहे की, २०११ मध्ये चीनची गुंतवणूक ०.३ बिलीयन डॉलर्स होती. २०१२ मध्ये ०.३१ तर २०१३ मध्ये २.७ बिलीयन डॉलर्स झाली. मात्र, स्वत:च आकडे देऊन कॉंग्रेस फसलीही. २०१२ ते २०१३ दरम्यान गुंतवणूक आठ पट वाढल्याचे मान्य केले. मात्र, कॉंग्रेसची ही आकडेवारी चुकीची असल्याचे दिसून आले आहे. २०१९ मध्ये चीनची गुंतवणूक ४.४ बिलीयन डॉलर्स नव्हे १६३.७७ मिलीयन डॉलर्स होती. गेल्या तीन वर्षांत गुंतवणूक सातत्याने कमी झाली आहे. २०१७ मध्ये ३५०.२२ मिलीयन डॉलर्स तर २०१८ मध्ये २२९ मिलीयन डॉलर्स होती.

अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर सिंह यांनी गेल्या वर्षी १४ सप्टेंबर रोजी लोकसभेत खुलासा करून ही आकडेवारी दिली होती. कॉंग्रेसने केवळ भाजपाच्या काळातीलच नव्हे तर स्वत:च्या काळातील आकडेवारीही चुकीची दिली आहे. कॉंग्रेसच्या म्हणण्यानुसार २०१३ मध्ये चीनची गुंतवणूक २.७ बिलीयन डॉलर्स होती. मात्र, प्रत्यक्षात भारतातील चीनच्या गुंतवणुकीचा आकडा कधीही १ बिलीयन डॉलर्सच्या पुढे गेला नाही. २०१५ पासून यामध्ये सातत्योन घटच होत आहे.

Congress lies to criticize Modi government

चीनी व्हायरसच्या महामारीनंतर भारतातील काही कंपन्यांची आर्थिक स्थिती खालावली होती. त्यांना चीनी कंपन्यांनी ताब्यात घेऊ नये यासाठी सरकारने चीनमधून येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीला कडक निर्बंध लागू केले आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती