आक्रमक नानांवर काँग्रेसचा गमावलेला पाया मजबूतीची आणि विस्ताराची जबाबदारी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशात काँग्रेस कात टाकायची तेव्हा टाकेल, पण महाराष्ट्रात तरी काँग्रेसने कात टाकायला सुरूवात केली आहे, असे मानायला हरकत नाही. कारण मोदींशी पंगा घेऊन भाजपबाहेर पडलेल्या नाना पटोलेंवर काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवून त्यांच्यापुढे आव्हानाचे ताट वाढून ठेवण्याबरोबर पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याची संधी देखील दिली आहे.congress leadership throws challeges before nana patole to expand the lost party base in maharashtra

प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा हा काटेरी मुकूट आहे. पण त्याच बरोबर काँग्रेसची सध्याची अवस्था पाहता काम करण्यास देखील भरपूर संधी उपलब्ध आहे, असे मानावे लागेल. काँग्रेस संस्कृतीत एखाद्याला मोठे पद देताना त्याच्या भोवती अशी माणसे पेरली जात, की त्याने त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करत काम करताना त्याची दमछाक व्हावी. नानांसाठी सुरूवातीला तरी अशी परिस्थिती नाही. उलट त्यांना काँग्रेस पक्ष संघटना वाढविण्यासाठी किंबहुना काँग्रेसला पूर्वीच्या राजकीय वैभवाप्रत नेण्यासाठी काम करण्याची संधी आहे. आणि ते काम पूर्वीएवढे सोपे नाही.येथेच नानांसारख्या आक्रमक नेतृत्त्वाची कसोटी लागणार आहे. नानांना एकाच वेळी भाजपसारख्या उघड विरोधकाशी सामना करताना शिवसेना आणि विशेषतः राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाशी संघर्ष करावा लागणार आहे. आणि हा संघर्ष जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये करावा लागणार आहे. मुंबईत भाई जगतापांसारखा नेता त्यांच्या जोडीला आहे. पुणे, नागपूर, नगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा यांच्या सारख्या काँग्रेसच्या जुन्या बालेकिल्ल्यांना सावरण्यासाठी नानांना प्रयत्न करावे लागणार आहेत. तिथे त्यांची गाठ भाजपच्या बरोबरीने किंबहुना अधिक राष्ट्रवादीशी आहे. कारण या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचे शोषण करूनच पवारांनी राष्ट्रवादी पक्ष पोसला आहे. विदर्भात नानांना प्रबळ भाजपशी सामना करावा लागेल.बाळासाहेब थोरातांचे नेतृत्त्व समन्वयी किंबहुना शरद पवारांच्या राजकारणापुढे झुकणारे होते. त्यांचा उपयोग महाविकास आघाडीचे सरकार आणण्यापुरता होता. पण त्यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसला सरकारमध्ये तिय्यम स्थान स्वीकारावे लागले. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे दोन माजी मुख्यमंत्री पक्षात असताना विधिमंडळात काँग्रेसला तिय्यम स्थान स्वीकारावे लागले.

ही राजकीय अवस्था बदलण्याचे मोठे आव्हान नानांपुढे असेल. औरंगाबादसह मुंबई, पुणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणूका ही पक्षवाढीसाठी काम करण्याची संधी असेल. ती नाना कशी घेतात, यावर काँग्रेसच्या बरोबरीने खुद्द त्यांचेही राजकीय भवितव्य अवलंबून असेल.

congress leadership throws challeges before nana patole to expand the lost party base in maharashtra

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*