ट्रम्प – मोदी मैत्रीबाबत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत नाही; शशी थरूर, अनंत गाडगीळ यांची परस्पर विरोधी विधाने


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मुंबई – अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीबद्दल सोशल मीडियावर भरपूर शेरेबाजी चालू असताना काँग्रेसच्या दोन उच्च शिक्षित नेत्यांमध्येच एकमत नसल्याचे समोर आले आहे. congress leaders shashi tharoor and anant gadgil contradicts each others statements over donald trump – narendra modi friendship

ट्रम्प जाऊन बायडेन आले तरी भारत अमेरिका संबंधांमध्ये फरक पडणार नाही, असे विधान शशी थरूर यांनी काल केले होते, तर ट्रम्प यांच्यासारख्या बेजबाबदार व्यक्तीशी मोदींनी मैत्री केल्याचे दुष्परिणाम भारताला भविष्यात भोगावे लागतील, असे विधान प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केले आहे.


ट्रम्प समर्थकांचा कॅपिटॉल हिलवर अभूतपूर्व धुडगूस, तोडफोड; अमेरिकन काँग्रेस सायंकाळपर्यंत बायडेनच्या विजयावर शिक्कामोर्तब करणार; ट्रम्प यांची सगळी सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड; मोदींचा शांततापूर्ण सत्तांतराला पाठिंबा


डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या बेजबाबदार व्यक्तीसाठी लाखो रुपये खर्च करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी मोठी रॅली आयोजित केली होती. दुसऱ्या देशाच्या अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी एखाद्या देशात अशी रॅली आयोजित करणे परराष्ट्र धोरणाला अनुसरून होत नाही. यातून मोदींच्या परराष्ट्र धोरणाची अपरिपक्वता उघड झाली आहे. ट्रम्प यांच्याशी नरेंद्र मोदी यांच्या दोस्तीचे दुष्परिणाम भविष्यात भारताला भोगावे लागणार आहेत, अशी टीका अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

congress leaders shashi tharoor and anant gadgil contradicts each others statements over donald trump – narendra modi friendship

तर, शशी थरूर यांनी काल मोदींवर निशाणा साधला असला, तरी बायडेन प्रशासनाबरोबर काम करण्याची मोदींनी तयारी ठेवावी. भारत – अमेरिका संबंधांमध्ये फारसा फरक पडणार नाही, असे विधान थरूर यांनी केले होते. असे संबंध दोन व्यक्तींचे नव्हे, तर दोन देशांचे असतात असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.
सोशल मीडियावर मोदी – ट्रम्प यांच्या मैत्रीवरून दोन्ही बाजूंनी शेरेबाजी चालू असताना काँग्रेसच्या दोन नेत्यांच्या विधानांमधली विसंगती मात्र समोर आली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती