Paramavir letterbomb; ठाकरे – पवारांची अब्रू गेली; काँग्रेस नेत्यांची खुशीची अळीमिळी गुपचिळी!!

विनायक ढेरे

मुंबई : मनसुख हिरेन – सचिन वाझे – परमवीर सिंग – अनिल देशमुख वसुली या प्रकरणांमध्ये ठाकरे – पवार सरकारची पुरती अब्रू गेली… काँग्रेस नेत्यांची मात्र अळीमिळी गुपचिळी… अशी महाराष्ट्रातली अवस्था आहे… नाही म्हणायला सचिन सावंत प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलले आहेत… पण ते एकटेच बोलताना दिसत आहेत.why congress leaders like ashok chavan, prithviraj chavan keeping silence over anil deshmukh issue?

ठाकरे – पवार महाविकास आघाडी सरकारमधले महत्त्वाचे काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एवढ्या गदारोळात काही बोलायला तयार नाहीत. त्यांची काही मोठी प्रतिक्रियाही आलेली दिसली नाही… ही फक्त राजकीयदृष्ट्या शांततेत घ्यायची बाब राहिलेली नाही.ज्या अर्थी वरवर शांतता दिसते आहे, त्या अर्थी आतमध्ये बरेच काही शिजते आहे, असे राजकारणात मानले जाते… आणि इथे तर काँग्रेसचे नेते “शांत” आहेत. कितीही गलितगात्र झाला असला तरी काँग्रेस पक्षाचे हे नेते आहेत. अनेक वर्षे आत्ता आहेत, त्या पेक्षा मोठी पदे त्यांनी भूषविली आहेत आणि ते अजून बाहेर येऊन बोलत नाहीत… यामागे काही राजकीय अर्थ दडला आहे का…

नक्कीच आहे… वर म्हटल्याप्रमाणे या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राजकीय अब्रुची लक्तरे देशाच्या वेशीवर टांगली जाताहेत. हे दोन्ही नेते राजकीयदृष्ट्या सापटीत सापडले आहेत. त्यांची कोंडी झालेली आहे. त्यांची ही स्थिती काँग्रेस नेत्यांसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत आनंदाची आहे… कारण सत्तेवर राहून ठाकरे – पवार हे दोघे काँग्रेस नेत्यांना चेपत होते. सत्तेचा पाहिजे तेवढा वाटा आणि अधिकार काँग्रेस नेत्यांना देत नव्हते.

अशा स्थितीत ठाकरे – पवारांची राजकीय अडचण हीच काँग्रेस नेत्यांसाठी संधी हा याचा साधा राजकीय अर्थ आहे. विशेषतः अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या मुरलेल्या नेत्यांना तर तो सांगायची गरजच नाही.अशोक चव्हाण तरी मंत्री आहेत. भले त्यांना त्यांच्या वकुबाचे आणि सन्मानाचे खाते नसेल मिळाले, तरी… पण पृथ्वीराज चव्हाण तर फक्त आणि फक्त पवारांच्या राजकारणामुळेच पदापासून वंचित राहिले आहेत.

पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस हे दोन माजी मुख्यमंत्री पवारांच्या डोळ्यात सलतात. सुमारे साडेआठ वर्षे या दोन मुख्यमंत्र्यांची राजवट पवारांना सहन करावी लागली आहे. त्यामुळे पवारांचा या दोन्ही नेत्यांना कडवा विरोध आहे.

असे विरोधी पवार जर अडचणीत आले असतील, तर पृथ्वीराज चव्हाणांसाठी त्यासारखा दुसरा राजकीय आनंद नाही. म्हणून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरातांसारखे नेते एवढ्या मोठ्या गदारोळात गप्प राहिले असले, तर त्याचे आश्चर्य वाटायचे कारण नाही, उलट त्यांच्यासाठी ही अनोखी राजकीय संधी चालून आली आहे, असे मानावे लागेल.

why congress leaders like ashok chavan, prithviraj chavan keeping silence over anil deshmukh issue?

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*