मोदी – ट्रम्प मैत्रीवर काँग्रेस नेत्यांची परस्पर विरोधी विधानांनंतर सामनातून मैत्रीबद्दलच खोचक टीका


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मैत्रीवरून काँग्रेस नेत्यांची परस्पर विरोधी विधाने आल्यानंतर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून ट्रम्प – मोदी मैत्रीवर दुगाण्या झाडल्या आहेत. congress leaders contradicts each other over trump – modi friendship issue, but shiv sena targets narendra modi

काँग्रेस नेते शशी थरूर आणि अनंत गाडगीळ या दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी ट्रम्प – मोदी मैत्रीवर भाष्य केले. पण ते परस्पर विसंगत निघाले. मोदी – ट्रम्प मैत्री असली आणि ते पराभूत झाले असले, तरी बायडेन प्रशासनात भारत – अमेरिका संबंधांवर फारसा परिणाम होणार नाही, असे मत थरूर यांनी व्यक्त केले. तर मोदी – ट्रम्प यांच्या मैत्रीची किंमत आपल्याला कॅपिटॉल हिलवरील ट्रम्प समर्थकांच्या धुडगुसानंतर भारत – अमेरिका संबंधांमध्ये चुकवावी लागेल, असे मत अनंत गाडगीळ यांनी व्यक्त केले. काँग्रेसच्या दोन उच्च शिक्षित नेत्यांमधले मतभेदच या निमित्ताने सामोर आले.

एवढे झाल्यानंतर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून शेलकी भाषा वापरत मोदी – ट्रम्प मैत्रीवरून भारत – अमेरिका संबंधांवर दुगाण्या झाडल्या आहेत. सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे, की “अमेरिकेच्या संसदेत जे घडले ते जगात कोणत्याही देशात घडू नये. पंतप्रधान मोदी यांनी आता ट्रम्प यांचा निषेध केला. मात्र याआधी ट्रम्पची भलामण केली याचेही दुःख त्यांना होतच असेल! निवडणुकीचा निर्णय फिरविण्यात यावा यासाठी ट्रम्प यांनी यंत्रणेवर दबाव आणला. भ्रष्टाचाराचे मोह निर्माण केले, पण यापैकी एकही यंत्रणा ट्रम्प यांना बधली नाही. ट्रम्प यांनीच नेमलेले हे सर्व लोक होते. पण त्या सगळ्यांनी अमेरिकेच्या संविधानाशीच आमची बांधीलकी असल्याचे स्पष्ट केले. हे सर्व प्रयोग कोसळले तेव्हा एखाद्या गुंडाप्रमाणे ट्रम्प यांनी लोकांना चिथावणी दिली. अमेरिकेच्या संसदेत जो हिंसाचार घडला त्याबद्दल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतीव दुःख व्यक्त केले आहे.

“ट्रम्प यांचे वर्तन व बोलणे हे सुसंस्कृत माणसासारखे कधीच नव्हते. त्यांचा सार्वजनिक वावर हा शिसारी आणणाराच होता. अशा माणसासाठी मोदी सरकारने अहमदाबादेत लाल गालिचे अंथरले होते. हा समस्त गुजराती बांधवांचा, गांधी, सरदार पटेलांचाच अपमान आहे. बरे झाले, या दळभद्री ट्रम्पचे पाय आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्रास लागले नाहीत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पंतप्रधान मोदी यांनी गुजरातेत नेऊन मिरवले. त्या चिनी राष्ट्राध्यक्षाने आता लडाखमध्ये त्यांचे सैन्य घुसवले. ट्रम्प यांना अहमदाबादेत नेले, त्यांनी येताना कोरोना आणला व आता लोकशाहीची सरळ हत्याच केली. आमचे परराष्ट्र धोरण हे प्रवाहपतित होत आहे,” असं म्हणत शिवसेनेनं केंद्राच्या परराष्ट्र धोरणावरही निशाणा साधला आहे.

“ट्रम्प यांनी आता सत्तेचे हस्तांतर करण्यास मान्यता दिली आहे. म्हणजे जगावर मोठे उपकारच केले म्हणायचे! हिंदुस्थानातील लोकशाहीकडून अमेरिका, ब्रिटनने धडे घ्यायला हवेत. निवडणुकीत पराभव होताच इंदिराजी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग अशा प्रत्येक नेत्याने शांतपणे सत्तेचे हस्तांतरण केले आहे. उद्या मोदींचा पराभव लोकशाही मार्गाने झाला तर तेसुद्धा त्याच परंपरेचे पालन करतील. म्हणून प्रिय मित्र असूनही ट्रम्प यांच्या झुंडशाहीचा धिक्कार पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.

congress leaders contradicts each other over trump – modi friendship issue, but shiv sena targets narendra modi

अमेरिका – हिंदुस्थानच्या लोकशाहीत साम्यस्थळे नाहीत. विसंगतीच जास्त आहे. आमच्याकडे निवडणुकांत पराभव होऊ नये यासाठीच हिंसाचार, धर्मद्वेषाचे राजकारण पेटवले जाते. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना हतबल केले की त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची वेळच येत नाही, अशी टीका सामनाने अग्रलेखात केली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती