काँग्रेस नेते confused!!; बाळासाहेब थोरात म्हणतात, एकच पत्र आणि मंत्र्यांची कसली चौकशी??; पक्ष प्रभारी एच. के. पाटील म्हणतात, अंतिम निर्णय व्हायचाय!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सचिन वाझे – अनिल देशमुख खंडणीखोरी प्रकरणात शिवसेना आणि राष्ट्रवादी अडचणीत सापडलेले असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते मात्र संभ्रमावस्थेत गेल्याचे दिसते. गेले दोन दिवस या विषयावर अळीमिळी गुपचिळी साधून असलेले काँग्रेस नेते आज बोलले, पण परस्पर विरोधी वाटावे असे…congress leaders confused over anil deshmukh issue, balasaheb thorat and h. k. patil set a different tunes

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, की गृहमंत्री अनिल देशमुखांच्या चौकशी बाबतचा निर्णय झालेल नाही तर तसा विषय येतो कुठे? आम्ही या विषयात इतके पुढे गेलोच नाही, एक पत्र आणि लगेच त्या मंत्र्याची चौकशी असे कसे होऊ शकते? भाजपा शेवटी विरोधी पक्षात आहे,सतत प्रयत्न सुरू असतो, जी गोष्ट घडली त्यावरून वातावरण निर्मिती करण्याकरता त्यांना संधी वाटत आहे. फक्त सत्तेसाठी चाललेला त्यांचा प्रयत्न आहे. काही प्रश्न असे आहेत की ज्याचे उत्तर मी देण्याची आवश्यकता नाही, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेले आहेत, त्यांनीच माहिती देणे योग्य आहे.”

महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी काँग्रेस नेत्यांशी विडिओ कॉन्फरन्स घेऊन संवाद साधला, त्यानंतर काढलेल्या पत्रकात आपण संवाद कसा साधला याचे वर्णन करून मुख्यमंत्री निर्णय घेतील. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय व्हायचा आहे, असे स्पष्ट केले. चौकशी व्हावी किंवा होऊ नये, यावर त्यांनी काही भाष्य केले नाही. थोरातांनी कसली चौकशी म्हणून तो विषय बाजूला काढला होता.

पण काँग्रेस हायकमांडने नेमलेल्या प्रभारी एच. के. पाटील यांनी त्यावर भाष्य न करता केवळ संवाद साधून माहिती घेतली आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, एवढेच लेखी पत्रक काढले. यातून काँग्रेस नेत्यांची संभ्रमावस्थाच दिसून आली.

congress leaders confused over anil deshmukh issue, balasaheb thorat and h. k. patil set a different tunes

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*