काँग्रेसमधली अस्वस्थता केंद्रातून प्रदेश पातळीवर झिरपली; थोरात, गोहिलांनी वाचा फोडली

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा पेच वेळीच सोडविला गेला नसल्याचे परिणाम आता फक्त केंद्रीय स्तरावर न उरता, राज्यांच्या पातळीपर्यंत झिरपू लागल्याचे प्रत्यंतर आता येऊ लागले आहे. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि बिहारचे प्रभारी शक्तिसिंग गोहिल ही त्याची प्रदेशपातळीवरची उदाहरणे ठरताना दिसत आहेत. congress leaders balasaheb thorat, shakti gohil express concern over party leadership


औरंगाबादमध्ये काँग्रेसचा महापौर; शिवसेनेच्या सत्तेला काँग्रेसने ललकारले


केंद्रातील मोदी सरकारवर धोरण लकवा भरल्याची टीका करणाऱ्या काँग्रेस पक्षातच विविध पातळ्यांवर नेतृत्व ठरविण्याचा धोरण लकवा भरल्याचे यातून स्पष्ट होते आहे. ते असे –

  • पक्षाच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी हंगामी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना पत्र लिहून काही महिने उलटून गेले आणि काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील बैठका झाल्या तरी पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळालेला नाही. त्याबद्दल बातम्यांचा वावड्या मात्र भरपूर हवेत उडताना दिसत आहेत.
  • तीच अस्वस्थता प्रदेश पातळीवर महाराष्ट्रात दिसते आहे. बाळासाहेब थोरात दिल्लीत गेल्यावर त्यांना त्यांच्याच राजीनाम्याची बातमी समजली आणि नंतर त्यांनी त्या बातमीचा इन्कार केला… पण त्याच बातमीत त्यांनी दुसरा कोणी पक्षश्रेष्ठींना सापडला तर प्रदेशाध्यक्षपद सोडायची तयारीही दाखविली आहे… एकाच वेळी एकाच बातमीत त्यांनी नकार आणि होकार भरून नेतृत्वासंबंधी महाराष्ट्रात कशी संभ्रमावस्था आहे, हे दाखवून दिले.
  •  जी बाब केंद्रात आणि महाराष्ट्रात तीच बाब बिहारमध्ये… तेथे
  • विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या कॉंग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. बिहार प्रभारी शक्तीसिंह गोहिल यांनी पक्षाच्या प्रभारी पदावरून मुक्त करावे, अशी विनंतीच पक्षश्रेष्ठींना करून पक्षाच्या कार्यातून आपला वाटा कमी करायलाच सांगितले आहे
  • कॉंग्रेस नेते शक्तीसिंग गोहिल यांनी सांगितले की, “काही वैयक्तिक कारणांमुळे मी कॉंग्रेस हायकमांडला बिहार प्रभारी पदावरून मुक्त करावे आणि काही महिने दुसरी हलकी जबाबदारी देण्याची विनंती केली आहे.” गोहिल यांच्या या ट्विटनंतर विविध चर्चांना ऊत आला आहे. बिहार काँग्रेसमधील अंतर्गत दुफळीची चर्चा रंगू लागली आहे.
  • याचा अर्थच केंद्रीय स्तरापासून राज्यस्तरांपर्यंत ही अस्वस्थता झिरपू लागली आहे. त्याची सुरवात बिहार आणि महाराष्ट्रात झाली आहे… त्याचवेळी दोन्ही पक्षश्रेष्ठी मात्र देशाबाहेर आहेत.

congress leaders balasaheb thorat, shakti gohil express concern over party leadership

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*