कॉंग्रेसच्या नेत्याने केली मुंबई महापालिकेतील कारभाराची पोलखोल, म्हणाले कोणताही प्रस्ताव वरून आलाय असे सांगितले जाते

मुंबई महापालिकेचा कारभार शिवसेना कसा चालविते याची पोलखोल मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसनेच केली आहे. स्थायी समितीमध्ये कोणताही प्रस्ताव आला की तो वरून आला असे सांगितले जाते, असा आरोप कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. पालिकेच्या प्रस्तावांमध्ये मातोश्रीवरून थेट हस्तक्षेप होत असल्याचा अप्रत्यक्ष दावाच रवी राजा यांनी केला आहे. Congress leader Kelly scoffs at Mumbai Municipal Corporation


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेचा कारभार शिवसेना कसा चालविते याची पोलखोल मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसनेच केली आहे. स्थायी समितीमध्ये कोणताही प्रस्ताव आला की तो वरून आला असे सांगितले जाते, असा आरोप कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. पालिकेच्या प्रस्तावामध्ये मातोश्रीवरून हस्तक्षेप होत असल्याचा अप्रत्यक्ष दावाच रवी राजा यांनी केला आहे.

रवी राजा म्हणाले की, स्थायी समितीमध्ये कोणताही प्रस्ताव आला की हा प्रस्ताव वरून आला असं शिवसेना सांगत असते. वरून म्हणजे नेमका कुठून? मंत्रालयातून प्रस्ताव मंजूर करण्याचा आदेश आला की वर्षावरून हे मात्र शिवसेना सांगत नाही,काँग्रेसकडे असलेले विरोधी पक्षनेतेपद हे भाजपला देण्यास शिवसेना तयार झाली आहे. दोन्ही जुने मित्र एकत्र येत आहेत, असा आरोपही रवी राजा यांनी केला आहे. यावर शिवसेनेचे नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शिवसेनेमुळेच काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले हे लक्षात ठेवावे असा इशारा दिला आहे. शिवसेनेने सहकार्य केले नसतं तर त्यांना हे पद मिळालं नसतं. पण ते आज असे का बोलतायत माहीत नाही, महाविकास आघाडीवर याचे परिणाम होतील, असे म्हणत असतील तर त्यांनी धमकी तर मुळात देऊच नये, असंही यशवंत जाधवांनी सुनावलंय.

शिवसेना अशा धमक्यांना घाबरत नाही. महाविकास आघाडीवर परिणाम होईल, असं काही मला वाटत नाही. छोटे मोठे मतभेद बसून सोडवले जातील. काँग्रेसने उगाच राईचा पर्वत करून नये.

Congress leader Kelly scoffs at Mumbai Municipal Corporation

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असले तरी शिवसेना आणि कॉंग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत देत आहे. काँग्रेस आणि शिवसेनेत शाब्दिक चकमकी झडत आहेत. परंतु, रवी राजा यांनी आता थेट शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वावरच निशाणा साधला आहे. सुमारे २५ हजार कोटी रुपयांचे बजेट असलेली मुंबई महापालिका शिवसेनेसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असल्याचे मानले जाते. महापालिकेतील निर्णयांवर थेट मातोश्रीवरून लक्ष ठेवले जाते. परंतु, स्थायी समितीमध्ये येणारे प्रस्तावही थेट मातोश्रीवरूनच येतात असे सांगून रवी राजा यांनी शिवसेनेची पोलखोल केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*