काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात नाराज? पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीला गेले आहेत. पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन ते प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे. Congress leader Balasaheb Thorat Possibility to resign as state president


विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीला गेले आहेत. पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन ते प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

महाराष्ट्रातील सत्तेत काँग्रेसला वाटा मिळवून देण्यात आणि महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीत बाळासाहेब थोरातांची महत्त्वाची भूमिका होती. बाळासाहेब थोरातांकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद आणि विधिमंडळ नेता अशी दोन पदे होती. याशिवाय ते महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्रीही आहेत. यामुळेच महाराष्ट्रातील काही नेते सातत्याने दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींसमोर प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत बोलत होते. या सततच्या चर्चांमुळेच नाराज होऊन बाळासाहेब थोरात आता प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवती जात आहे.बाळासाहेब थोरातांनी जर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर त्यांच्या जागेवर कोणता नेता असेल, याबाबतही विविध नावे चर्चेत आहेत. यामध्ये राजीव सातव, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, नाना पटोले तसेच विजय वडेट्टीवार यांच्या नावांचा समावेश आहे. यामुळे वरीलपैकी काँग्रेसचा पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण हे आगामी काळात स्पष्ट होईल.

Congress leader Balasaheb Thorat Possibility to resign as state president

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*