मोदींनी बंगालमधून गुजरातमध्ये नेलेल्या टाटा प्रकल्पाची काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींकडून स्तुती


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडताना काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी हे न कळत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करून बसले. ममतांनी टाटांच्या सिंगूर प्रकल्पात अडथळे आणून तो बंगालबाहेर घालवला. पण गुजरातमध्ये गेल्यावर तो आदर्श प्रकल्प ठरला, अशी स्तुती अधीररंजन चौधरी यांनी केली. Congress leader Adhir Ranjan Chaudhary praises Modi’s Tata project from Bengal to Gujarat


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडताना काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी हे न कळत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करून बसले. ममतांनी टाटांच्या सिंगूर प्रकल्पात अडथळे आणून तो बंगालबाहेर घालवला. पण गुजरातमध्ये गेल्यावर तो आदर्श प्रकल्प ठरला, अशी स्तुती अधीररंजन चौधरी यांनी केली.

ही घडामोड घडली तेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. ममतांनी टाटांच्या प्रकल्पात अडथळे उभे करताच मोदींनी जाहीरपणे टाटांना गुजरातमध्ये प्रकल्प सुरू करण्यासाठी निमंत्रण दिले. साणंद येथे तात्काळ जमीन उपलब्ध करवून दिली. आणि त्यानंतर बंगालच्या सिंगूरमधील प्रकल्प टाटांनी साणंदला हलविला. हा प्रकल्प विकासाचे आदर्श मॉडेल ठरल्याची स्तुती अधीर रंजन चौधरी यांनी केली. ममतांमुळे हा प्रकल्प बंगालबाहेर जाऊन आदर्श ठरला. काँग्रेसने ममतांना त्यासाठी कधीही पाठिंबा दिला नाही, असे चौधरी यांनी स्पष्ट केले.अधीररंजन चौधरी काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते आहेत. त्यांनीच मोदींची अप्रत्यक्ष स्तुती करणे याला राजकीय महत्त्व आहे. काँग्रेसची सध्या डाव्या आघाडीशी जागावाटपाबाबत चर्चाही सुरू आहे. चौधरी यांचे हे विधान ममतांबरोबरच डाव्यांनाही टोचणारेच आहे. कारण त्यांच्याही राजवटीच्या काळात बंगाल औद्योगिकीकरणाला मुकला आहे.

Congress leader Adhir Ranjan Chaudhary praises Modi’s Tata project from Bengal to Gujarat

बंगालच्या राजकारणावर भाष्य करताना मात्र अधीर रंजन चौधरींनी ममतांची तृममूळ काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष राज्यातील जनतेच्या दूरवस्थेबद्दल बोलत नाहीत, तर आपापसांत भांडत आहेत, अशी टीका केली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था