कॉंग्रेस सरकारच्या दिरंगाईमुळे दुप्पट वाढला अटल टनेलचा खर्च

हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक लांबीच्या अटल बोगद्याचे उद्घाटन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते. मात्र, कॉंग्रेस सरकारच्या दिरंगाईमुळे या बोगद्याचा खर्च तीन पट वाढला आहे. सुमारे आठशे कोटी रुपये खर्चात जे काम झाले त्यासाठी आता २४०० कोटी रुपये खर्च झाला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक लांबीच्या अटल बोगद्याचे उद्घाटन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते. मात्र, कॉंग्रेस सरकारच्या दिरंगाईमुळे या बोगद्याचा खर्च तीन पट वाढला आहे. सुमारे आठशे कोटी रुपये खर्चात जे काम झाले त्यासाठी आता २४०० कोटी रुपये खर्च झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शनिवारी हिमाचल प्रदेशातील रोहतांगमध्ये मनाली-लेह महामार्गावर जगातील सर्वाधिक लांबीचा बोगदा अटल बोगद्याचे उद्घाटन झाले. याप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले, आधी देशात सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रकल्पांकडे गांभीर्याने पाहिले गेले नसावे. लष्करी क्षमतांना रोखण्याचेही प्रयत्न झाले.

२००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या बोगद्याच्या संपर्क मार्गाचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर संपुआ सरकारला या प्रकल्पाचे जवळपास विस्मरण झाले. बोगद्याचे काम संथगतीने सुरू होते. ते पाहता हे काम २०४० पर्यंत पूर्ण झाले असते. मात्र, २०१४ मध्ये रालोआ सरकार सत्तेवर आले आणि त्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ३२०० कोटी रुपये खर्च आला.

गेल्या सरकारच्या कामातील विलंबामुळे खर्च तीनपटीने वाढला. मागील सरकार असते तर किती खर्च वाढला असता कोण जाणे? यूपीए सरकारने लडाखमध्ये दौलतबेग ओल्डी हवाई पट्टी तयार करण्याची इच्छाशक्ती दाखवली होती. खरे तर मागील सरकारने अशा सामरिक महत्त्व असलेल्या अनेक प्रकल्पांना लटकावले होते. ईशान्य व अरुणाचलला जोडणाऱ्या सेतूचे कामही अटलजींच्या सरकारने सुरू केले होते. संपुआ सरकारने तेदेखील लटकावले. बिहारच्या कोसी पुलाबाबतही अशीच वागणूक पाहायला मिळाली होती, असे मोदींनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*