कॉंग्रेसच्या सरकारांची गुंडांना साथ, बाहुबली मुख्तार अन्सारीच्या फरार मुलाचा जयपूरमध्ये शाही विवाह

उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचा बाहुबली आमदार मुख्तार अन्सारी याचा आणि फरार गुन्हेगार असलेला मुलगा अब्बास अन्सारी याचा राजस्थानातील कॉंग्रेस सरकारच्या आशिर्वादात जयपूरमध्ये चक्क शाही विवाहसोहळा झाला. मुख्तार अन्सारीने हत्या केलेल्या कृष्णानंद राय यांच्या पत्नी आमदार अलका राय यांनी याबाबत थेट प्रियंका गांधी- वड्रा यांना सवाल केला आहे. Congress govt backs goons, royal wedding of fugitive son of Bahubali Mukhtar Ansari in Jaipur


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचा बाहुबली आमदार मुख्तार अन्सारी याचा आणि फरार गुन्हेगार असलेला मुलगा अब्बास अन्सारी याचा राजस्थानातील कॉंग्रेस सरकारच्या आशिर्वादात जयपूरमध्ये चक्क शाही विवाहसोहळा झाला. मुख्तार अन्सारीने हत्या केलेल्या कृष्णानंद राय यांच्या पत्नी आमदार अलका राय यांनी याबाबत थेट प्रियंका गांधी- वड्रा यांना सवाल केला आहे.

उत्तर प्रदेशातील बाहुबली असलेला मुख्तार अन्सारी बहुजन समाज पक्षाचा आमदार आहे. त्याचा मुलगा अब्बास याच्यावर खुनाचा गुन्हा आहे. त्याची माहिती देणाऱ्यासाठी उत्तर प्रदेशात २५ हजार रुपयांचे इनामही जाहीर आहे. मात्र, अब्बास अन्सारी याचा जयपूरमध्ये शाही विवाह सोहळा झाला. फरार गुन्हेगार असतानाही कॉंग्रेस सरकारचा आशिर्वाद असल्याने पोलीसांनी कोणतीही कारवाई केली नाही.उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने मुख्तार अन्सारी गॅंगच्या गुन्हेगारी टोळीला नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधला आहे. त्याचे गाझीपूर येथील हॉटेल जमीनदोस्त करण्यात आले. त्याचबरोबर कोट्यवधी रुपयांची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्तार अन्सारीच्या गॅंगने राजस्थानात आसरा घेतला आहे. त्याला कॉंग्रेसच्या सरकारची मदत होत आहे. मुख्तार अन्सारी याने गाझीपूरमधील मोहम्मदाबादचे आमदार कृष्णानंद राय यांची २००५ मध्ये गोळी मारून हत्या केली होती. त्यांच्या पत्नी अलका राय यांनी याबाबत कॉंग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी-वड्रा यांना भावनिक पत्र लिहून सवाल केला आहे. एक महिला म्हणून आपण माझी वेदना समजू शकाल अशी मला आशा वाटत होती, असे अलका राय यांनी म्हटले आहे.

Congress govt backs goons, royal wedding of fugitive son of Bahubali Mukhtar Ansari in Jaipur

मुख्तार अन्सारी सध्या पंजाबमधील तुरुंगात शिक्षा भोगत आहे. अलका राय यांनी प्रियंका गांधी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपली राजस्थान आणि पंजाबमधील सरकारे मुख्तार अन्सारीला राज्य अतिथीचा दर्जा देत आहेत. त्याच्या मुलाच्या निकाहचे फोटो पाहिल्यावर स्पष्ट दिसत आहे की सरकारी आशिर्वादानेच हा सोहळा झालेला आहे. हे फोटो पाहिल्यावर माझ्या कुटुंबियांना वेदना झाल्या. उत्तर प्रदेश सरकारने तब्बल ३२ वेळा मुख्तार अन्सारीला राज्यात आणण्यासाठी वाहन पाठविले होते. परंतु, पंजाबमधील कॉंग्रेसच्या सरकारने त्याच्या प्रत्यार्पणास नकार दिला.

Congress govt backs goons, royal wedding of fugitive son of Bahubali Mukhtar Ansari in Jaipur

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*