कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगाचा झटका, ‘आयटम’ वक्तव्य भोवले


कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना एका महिला उमेदवाराबाबत ‘आयटम’ म्हणून केलेले वक्तव्य चांगलेच भोवले आहे. निवडणूक आयोगाने त्यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेतला आहे.


वृत्तसंस्था

भोपाळ : कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना एका महिला उमेदवाराबाबत ‘आयटम’ म्हणून केलेले वक्तव्य चांगलेच भोवले आहे. निवडणूक आयोगाने त्यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेतला आहे. कमलनाथ यांनी पुन्हा एकदा निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर आयोगाने ही कारवाई केली.

निवडणूक आयोगानं कमलनाथ यांच्यावर कारवाई केल्यानंतर म्हटलं आहे की, यापुढे जर कमलनाथ यांनी एकही प्रचारसभा केली तर त्याचा संपूर्ण खर्च हा त्या मतदारसंघातील उमेदवाराकडून वसूल केला जाईल. निवडणूक आयोगानं यापूर्वी कमलनाथ यांच्याविरोधात वादग्रस्त ‘आयटम’ विधानाप्रकरणी नोटीस पाठवली होती आणि ४८ तासांत याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.

पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान कमलनाथ यांनी भाजपाचे उमेदवार इमरती देवी यांना कथीतरित्या ‘आयटम’ संबोधले होते. यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटलं की, मी कोणाला असं बोललो नाही. जर यामुळे संबंधित व्यक्ती दुखावली गेली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, माझं तसं म्हणण्याचा हेतू नव्हता.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले होते की, काँग्रेसचा उमेदवार हा ‘सिंपल’ व्यक्ती आहे. विरोधकांचे उमेदवार इमरती देवी या ‘आयटम’ आहेत. या वादग्रस्त विधानानंतर मोठा राजकीय गदारोळ झाला होता. यावर कमलनाथ म्हणाले होते की, ‘आयटम’ हा वाईट शब्द नाही, त्याला त्या पद्धतीने घेता कामा नये.

राष्ट्रीय महिला आयोगाने देखील याप्रकरणी कमलनाथ यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलं होतं. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था