Congress Feels Insecure For Indian Celebrities Tweet Against International Propaganda see Shashi Tharoor Reaction On Twitter

काँग्रेसला सहन होईना भारतीय सेलिब्रिटीजचे देशाला एकजुटीचे आवाहन, शशी थरूर म्हणाले…

आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटींनी भारताची प्रतिमा डागाळण्यासाठी केलेल्या ट्विटच्या विरोधात देशातील नामांकित हस्ती पुढे आल्या. अनेक दिग्गज सरकारबरोबर पुढे येऊन देशवासीयांना एकजुटीचे आवाहन करताना पाहून काँग्रेसला सहन झालेले दिसत नाही. कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी देशाला एकजुटीचे आवाहन करणाऱ्या सेलिब्रिटींना लक्ष्य केले आहे. Congress Feels Insecure For Indian Celebrities Tweet Against International Propaganda see Shashi Tharoor Reaction On Twitter


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटींनी भारताची प्रतिमा डागाळण्यासाठी केलेल्या ट्विटच्या विरोधात देशातील नामांकित हस्ती पुढे आल्या. अनेक दिग्गज सरकारबरोबर पुढे येऊन देशवासीयांना एकजुटीचे आवाहन करताना पाहून काँग्रेसला सहन झालेले दिसत नाही. कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी देशाला एकजुटीचे आवाहन करणाऱ्या सेलिब्रिटींना लक्ष्य केले आहे.

शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा डागाळण्याचे षडयंत्र रचले जात आहे. बुधवारी अमेरिकन पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट केले. यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची एडल्ट स्टार मिया खलिफा व इतरही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी भारतविरोधी सूर लावला.

आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींच्या अशा ट्विटनंतर बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार, अजय देवगन, सुनील शेट्टी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, एकता कपूर, करण जोहर यांसारख्या सेलिब्रेटींनी पुढे सकारात्मक पाऊल उचलले. या भारतीय सेलिब्रिटींनी पुढे येऊन देशवासीयांना परकीय लोकांच्या नादी न लागता एक देश म्हणून एकत्र येण्याचे आवाहन केले. परंतु नेमके हेच काँग्रेसला सहन झालेले दिसत नाही. काँग्रेस नेते शशी थरूर बुधवारी म्हणाले की, केंद्राच्या आडमुठ्या धोरणामुळे लोकशाहीला न शोभणाऱ्या वर्तनामुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावरील जेवढी डागाळली त्याची भरपाई होऊ शकत नाही. यासोबतच कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी बॉलीवूड कलाकार आणि क्रिकेटपटूंनाही लक्ष्य केले आहे.तथापि, भारताने मात्र पॉप गायिका रिहाना आणि पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गच्या ट्विटवर कडक शब्दांत ताशेरे ओढले असून भारतविरोधी आंतरराष्ट्रीय प्रपोगेंडा यशस्वी होऊ देणार नसल्याचे निक्षून सांगितले आहे.

शशी थरूर यांचे ट्वीट

थरूर यांनी ट्विट केले की, “भारतीय सेलिब्रिटींना पाश्चात्य सेलिब्रिटींवर पलटवार करायला लावणे भारत सरकारसाठी लाजिरवाणे आहे. भारत सरकारच्या हट्टी आणि अनुचित वागणुकीमुळे भारताच्या जागतिक प्रतिमेचे जे नुकसान झाले आहे ते क्रिकेटपटूंच्या ट्विटवने भरून काढता येणार नाही.” दिग्गज क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे आणि रवी शास्त्री यांनी ‘इंडिया टुगेदर’ आणि ‘इंडिया अगेन्स्ट प्रपोगेंडा’ हॅशटॅग वापरून ट्विट केले आहे. यानंतर थरूर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. थरूर म्हणाले, “कायदे परत घ्या आणि शेतकऱ्यांशी तोडगा काढण्याबाबत चर्चा करा आणि मग भारत एकजूट होईल.”

Congress Feels Insecure For Indian Celebrities Tweet Against International Propaganda see Shashi Tharoor Reaction On Twitter

Congress Feels Insecure For Indian Celebrities Tweet Against International Propaganda see Shashi Tharoor Reaction On Twitter

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*