धान्य गोदाम मुद्द्यावर काँग्रेसच्या दुटप्पी नीतीचा भांडाफोड; शशी थरूर यांच्या ट्विटचा प्रकाश जावडेकर यांच्याकडून पुरावा सादर


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एकीकडे कृषी कायद्याचा विरोध करायचा आणि दुसरीकडे पुतना मावशीचे प्रेम शेतकऱ्यावर दाखवायचे, हा उद्योग काँग्रेसकडून अनेक वर्षे सुरु आहे. सत्तेत असताना धान्य साठवणुकीसाठी गोदाम उभारण्यासाठी खासगी क्षेत्राला चालना द्यावी, असे ट्विट करायचे.Congress double standard on grain Evidence of Shashi Tharoor’s tweet presented by Prakash Javadekar

या बाबीचा भांडाफोड केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. त्यासाठी त्यांनी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या एका ट्विटच्या पुरावा दिला आहे.धान्याची विशेषतः गव्हाची नासाडी गोदामआभावी होते. त्यामुळे अशी गोदामे उभारण्यासाठी खासगी क्षेत्राला चलना देण्याची गरज असल्याचे मत काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी 2010 मध्ये व्यक्त केले होते.

आता तीच काँग्रेस कृषी कायद्याला विरोध करून दुटप्पी भूमिका घेत आहे, असा टोला प्रकाश जावडेकर यांनी लगावला.

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी 2010 मध्ये एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी गोदामाअभावी गव्हाची नासाडी होते. ही नासाडी ऑस्ट्रेलियापेक्षा अधिक आहे.

त्यामुळे देशामध्ये साठवणूक आणि वितरण व्यवस्था चोख होण्यासाठी खासगी क्षेत्राला गोदामे उभारण्यासाठी चालना द्यावी, असे ट्विट केले होते. त्या ट्विटचा पुरावा प्रकाश जावडेकर यांनी दिला असून काँग्रेसच्या दुटप्पी नीतीचा भांडाफोड केला.

Congress double standard on grain Evidence of Shashi Tharoor’s tweet presented by Prakash Javadekar

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था