कॉंग्रेस सत्तेत आल्यास कृषी कायदे रद्द करू, प्रियंका गांधीचे शेतकऱ्यांना आश्वासन

विशेष प्रतिनिधी

लखनौ : कॉंग्रेस सत्तेत आल्यास कृषी कायदे रद्द करू, असे आश्वासन कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी दिले आहे. पश्चिसम उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथे किसान पंचायतीत बोलताना त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.Congress comes to power repeal agriculture laws Priyanka Gandhi assures farmers

त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. तिन्ही कृषी कायदे हे एखाद्या राक्षसासारखे आहेत. जर आपण सत्तेत आलो तर कायदे रद्द केले जातील.
जोपर्यंत कृषी कायदे रद्द होत नाही, तोपर्यंत कॉंग्रेस पक्ष लढा देत राहील, असेही त्यांनी सांगितले.तत्पूर्वी प्रियांका गांधी या डेहराडूनच्या जॉलीग्रांट विमानतळावरुन रस्ते मार्गाने सिद्धपीठ माता शाकुंभरी देवी मंदिरात पोचल्या. तेथे देवीचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी रायपूर खानका दर्ग्यात गेल्या आणि तेथे चादर अर्पण केली.

Congress comes to power repeal agriculture laws Priyanka Gandhi assures farmers

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*