बरे झाले माओवादी समोरून आले; काँग्रेसी शक्तींचे ध्रुवीकरण सुरू झाले!!

कोरोना प्रतिबंधक स्वदेशी लसीवर काँग्रेस नेत्यांचा आक्षेप आणि शेतकरी आंदोलनाला माओवाद्यांचा उघड पाठिंबा या दोन्ही घटना वरवर वेगळ्या वाटत असल्या तरी त्यातले राजकीय इंगित एकच आहे… कोणतीही जटिल समस्या सोडविण्यात सरकार यशस्वी होत असेल, तर आपले काय होणार? ही भीती डाव्यांना आणि काँग्रेसी ताकदींना सतावते आहे… त्यातून त्यांचे आपापसांत ध्रुवीकरण सुरू आहे. congress and maoists inevitably come togather to oppse modi govt


विनायक ढेरे

देश कोरोना महामारीविरोधातील युध्दात निर्णायक टप्प्यावर देश आला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल म्हणाले खरे, पण त्यांच्या बोलण्याचा संदर्भ कोरोना लसीच्या वापराशी होता. पण ही निर्णायक लढाई आणि निर्णायक वळण दुसऱ्याच दिवशी एवढ्या ठळकपणे समोर येईल असे वाटले नव्हते.

आता हेच पाहा ना… कोरोनाच्या दोन लसींना एकाच दिवशी आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. त्यातली एक लस भारत बायोटेकची स्वदेशी लस आहे. सरकारने लसींच्या वापराला परवानगी देताना देशी – परकीय असा भेदभाव केलेला नाही. पण काँग्रेसचे दोन बुद्धिमान नेते नेमक्या स्वदेशी लसीवर आक्षेप घ्यायला पुढे आले… आणि काल सायंकाळपर्यंत एक्स्पोज झाले… त्यांचे एक्स्पोज होणे एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले नाही, नेमक्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज माओवादी कम्युनिस्ट पत्रक काढून उघडपणे शेतकरी आंदोलकांच्या पाठिशी उभे राहिले… आता वरवर पाहता या दोन्ही घटना वेगवेगळ्या जरूर आहेत. पण त्यांच्यात एक संगती नाही, असे अजिबात म्हणता येणार नाही. डोळे उघडून नीट पाहिले… थोडा “अपरिमिते”च्या पलिकडचा दृष्टीकोन ठेवला की त्यातली संगती, त्यातल्या राजकीय – सामाजिक शेड्स लगेच लक्षात येतील.आत्तापर्यंत शेतकरी आंदोलन डाव्यांनी – शाहीनबागी इस्लामी ताकदींनी हायजॅक केलेय. शेतकऱ्यांमध्ये ती एलिमेंट्स घुसली आहेत, असे नुसते आरोप केले जात होते. पण आता माओवादी उघडपणे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यायला पुढे आल्याने सरकारचे नुसतेच आरोप सिद्ध झालेत असे नाहीत, तर कदाचित शेतकरी आंदोलनावरचा तोडगा जवळ आलाय की काय, असे वाटू लागले आहे…

याचे अत्यंत महत्त्वाचे कारण शेतकरी आणि सरकार या दोन्ही बाजू प्रामाणिक आहेत. त्यांच्यातील मतभिन्नता देखील प्रामाणिक आहे… शेतकरी आणि सरकार यांना तोडगा काढायचाय.. पण खरा प्रश्न आहे, तो पुढचाच… या आंदोलनावर यशस्वी तोडगा निघाला तर आपले काय होणार?? हा प्रश्न डाव्यांना, इस्लामी ताकदींना आणि काँग्रेसी शक्तींना सतावायला लागलाय… आणि शेतकरी आंदोलनाचा फायदा उपटून देशात अराजक माजविण्याचा डाव अथवा कारस्थान यशस्वी होत नाहीए म्हटल्यावर माओवादी उघडपणे मैदानात पुढे आलेत… एवढेच नाही तर त्यांनी सरकार विरोधातील ताकदींचे ध्रुवीकरण देखील नव्याने सुरू केलेय.

शशी थरूर आणि जयराम रमेश यांच्या सारख्या दोन बुध्दिमान काँग्रेस नेत्यांनी स्वदेशी लसीवर आक्षेप घेणे या घटनेचे देखील वरच्या सारखेच विश्लेषण करता येईल. कारण सरकारने तर दोन लसींच्या वापराला परवानगी दिली आहे. मग त्यातल्या नेमक्या स्वदेशी लसीवरच कसा काय ते आक्षेप घेतात?, त्या मागची कारणे आणि लॉजिक काय?… तर कारणे आणि लॉजिक एकच स्वदेशी लस तयार होऊन यशस्वी झाली, याचा शॉर्टटर्म आणि लाँगटर्म फायदा कोणाला होणार आहे, याची पुरती कल्पना थरूर आणि रमेश या नेत्यांना आली आहे. त्याच बरोबर त्याचे तोटे कोणाला… कसे… राजकीय आणि आर्थिक पातळ्यांवर सहन करावे लागणार आहेत, याची पुरेशी जाणीवही या दोन्ही नेत्यांना झाली आहे… स्वदेशी लसीमुळे आर्थिक गणिते नेमके कोणाची बिघडणार आहे?… याचा अभ्यास या दोन्ही काँग्रेस नेत्यांनी पक्का केला असणार आहे. त्यातूनच नेमका स्वदेशी लसीवर त्यांनी आक्षेप घेतला आहे.

याचा राजकीय अर्थ असा की, जिथे जिथे मोदी सरकार हात घालतेय तिथे तिथे ते जर यशस्वी झाले किंवा अगदी मर्यादित जरी यशस्वी आणि अयशस्वी ठरले तरी राजकीय गणिते कोणाची दीर्घकाळासाठी बिघणार आणि कायमची बिनसणार आहेत… याची स्पष्ट कल्पना थरूर आणि रमेश यांना आली आहे. हे दोघेही काँग्रेसचे निष्ठावान, बुध्दिमान आणि कर्तृत्ववान नेते आहेत… मग त्यांचे सर्वोच्च नेते सध्याच्या देशाच्या निर्णायक काळात देशाबाहेर असले तरी… वैचारिक निष्ठा थरूर आणि रमेश यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यातूनच त्यांनी स्वदेशी लसीवर आक्षेप घेऊन वातावरणात शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

congress and maoists inevitably come togather to oppse modi govt

याचाच अर्थ जेव्हा सरकार यशस्वी होताना दिसतेय, तेव्हा वेगवेगळे फंडे काढून सरकार विरोधी शक्ती आपापसातले ध्रुवीकरण पक्के करायचा प्रयत्न करताना दिसताहेत… स्वदेशी लसीला विरोध आणि शेतकरी आंदोलनाला माओवाद्यांचा पाठिंबा याची राजकीय संगती ही आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*