परमबीर सिंगांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून संभ्रम, टाईम्स नाऊच्या पत्रकाराने दिला सहीचा पुरावा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. मात्र, त्याच्यावरची सही परमबीर सिंग यांची आहे किंवा नाही यावरून संभ्रम निर्माण करणाऱ्या मुख्यमंत्री कार्यालयाला टाईम्स नाऊच्या पत्रकार मेघा प्रसाद यांनी पुरावा देत परमबीर सिंग यांची सही असलेले पत्रच ट्विट केले आहे. Confusion from CM’s office over Parambir Singh’s letter, proof of signature given by Times Now journalist


विशेष प्रतिनिधी

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. मात्र, त्याच्यावरची सही परमबीर सिंग यांची आहे किंवा नाही यावरून संभ्रम निर्माण करणाऱ्या मुख्यमंत्री कार्यालयाला टाईम्स नाऊच्या पत्रकार मेघा प्रसाद यांनी पुरावा देत परमबीर सिंग यांची सही असलेले पत्रच ट्विट केले आहे.गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परमबीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत ई-मेलवर शनिवारी दुपारी ४.३७ वाजता पत्र प्राप्त झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एनआयएकडून अटकेत असलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझेला महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप या पत्रात करण्यात आला होता.

मात्र, हे पत्र खरोखरच परमबीर सिंग यांनी लिहिले का? असा संभ्रम मुख्यमंत्री कार्यालयाकडून पसरविण्यात आला. परमबीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ई-मेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे परमबीर सिंग यांना गृह विभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले होते.

वास्तविक पाहता परमबीर सिंग यांनी अधिकृतरित्या आयपीएस अधिकाऱ्याच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ई-मेल पत्ता वेगळा आहे. त्यामुळे प्राप्त झालेला ई-मेल तपासून घेणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री कार्यालयामार्फत सांगण्यात येत होते. यावर मेघा प्रसाद यांनी परमबीर सिंग यांची सही असलेले पत्र ट्विट केले. सर्व शंकाखोरांसाठी, ही आहे परमबीर सिंग यांची सही असलेले पत्र, असे त्यांनी म्हटले आहे.

Confusion from CM’s office over Parambir Singh’s letter, proof of signature given by Times Now journalist

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*