गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुध्द पोलीसांत तक्रार, त्यांच्यासह शरद पवार आणि सचिन वाझे मास्टरमाइंड असल्याचा तक्रारीत उल्लेख

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अ‍ॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी ही तक्रार दिली असून त्यामध्ये देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हे भ्रष्टाचाराचे मास्टरमाइंड असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. Complaint lodged against Home Minister Anil Deshmukh, The complaint states that Deshmukh,Sharad Pawar and Sachin Waze are masterminds


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अ‍ॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी ही तक्रार दिली असून त्यामध्ये देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हे भ्रष्टाचाराचे मास्टरमाइंड असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं असून त्यात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. या पत्रात सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आहेत.यामध्ये मास्टरमाइंड महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख, शरद पवार आणि सचिन वाझे हे आहेत.

मोठे नेते असले तरी कोणाचीही गुन्ह्यातून सुटका करता येत नाही, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. अनिल देशमुख, सचिन वाझे, शरद पवार यांच्या संदभार्तील संभाषणाचे पुरावे जतन होणे गरजेचे आहे. मात्र, अनिल देशमुख हे स्वत:च गृहमंत्री असल्यामुळे कारवाई होत नाही. जेव्हा एखादा प्रकार निदर्शनास येतो.

तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून तत्काळ गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. मात्र, या गुन्ह्यामध्ये तशी कारवाई होताना दिसत नाही. आरोपी हे स्वत: गृहमंत्रालयाचे प्रमुख आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे पुढारी आहेत. त्यामुळे कायदेशी प्रक्रिया पार पाडली गेली नाही. परमबीर सिंग यांनी तशी हिम्मत दाखवली नाही. त्यामुळे सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणामध्ये संबंधितांविरुध गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे,असे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Complaint lodged against Home Minister Anil Deshmukh, The complaint states that Deshmukh,Sharad Pawar and Sachin Waze are masterminds

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*