गाईच्या शेणापासून बनविला चक्क रंग, जयपूरच्या कुमारप्पा इन्स्टिट्यूटचे तंत्र; शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे साधन


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गाईच्या शेणापासून रंग बनविण्याचे तंत्र विकसित झाले आहे. हा रंग जयपूरच्या कुमारप्पा नॅशनल हॅन्डमेड पेपर इन्स्टिट्यूटने तयार केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा रंग मंगळवारी बाजारात विक्रीस आला आहे. खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या (केव्हीसी) मदतीने त्याची विक्री होईल.  color made from cow dung Kumarappa Institute Jaipur

शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने हा अभिनव उपक्रम राबवला आहे. या रंगाला बीआयएस अर्थात भारतीय मानक ब्युरोने प्रमाणित केले आहे.

अँटीफंगल, बॅक्टेरिया प्रतिबंधक, पर्यावरणपूरकही

खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की हा रंग पर्यावरणपूरक आहे. हा रंग शेणापासून बनविलेला असून अँटीफंगल, अँटीबैक्टीरियल आहे. भिंतीवर रंग लावल्यावर फक्त चार तासांत कोरडा होईल. सध्या 2 लिटरपासून 30 लिटरपर्यंत त्याचे पॅकिंग तयार केले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार शेतकरी आणि गोशाळांना शेणातून 30 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे.


आसाममध्ये महामार्गाचे जाळे : गडकरी


शेणापासून बनविले चप्पल, बूट

अहमदाबाद येथील रहिवासी दिव्यकांत दुबे (वय 55) हे 8-10 वर्षांपासून शेणावर विविध प्रयोग करत आहेत. ते केवळ दहावी पास असून पेशाने चित्रकार आहे. ते साइन बोर्ड रंगवून, शिल्पकला करून जीवन जगतात. पण, शेणावरही विविध प्रयोग करतात. त्यांनी शेणापासून बरीच उत्पादने तयार केली आहेत. त्यामध्ये शेणाच्या चप्पल आहेत. त्या मजबूत, टिकाऊ आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. विशेष म्हणजे त्या अनेकांना आवडल्या आहेत.

color made from cow dung Kumarappa Institute Jaipur

पाण्यात ठेवल्या तर खराब होणार नाहीत

शेणाची चप्पल आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगली आहे. प्राचीन काळी लोक शेणाने सारविलेल्या घरात अनवाणी चालत असत. त्याचा थेट फायदा आरोग्यास झाला. आता घर शेणाने सारविणे शक्य नाही. परंतु शेणाने बनविलेल्या चप्पल परिधान केल्याने शरीराला ते सर्व फायदे मिळू शकतात. जर या चप्पल अर्ध्या तासासाठी पाण्यात ठेवल्या तर त्या खराब होणार नाहीत आणि तुटणार नाहीत, असा दावा दुबे यांनी केला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती