Coal Scam: Trinamool leader Vinay Mishra's brother arrested by ED, action against Mamatas relative Abhishek Banerjee inevitable!

Coal Scam: तृणमूल नेते विनय मिश्रांच्या भावाला ED कडून अटक, ममता बनर्जींचे नातेवाईक अभिषेक बॅनर्जींवर कारवाई अटळ!

अंमलबजावणी संचालनालयाने कोळसा घोटाळ्याप्रकरणी तृणमूल नेते विनय मिश्रा यांच्या भावाला अटक केली आहे. विनय मिश्रा हे ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. विनय मिश्रा यांचे भाऊ विकास मिश्रा यांना मंगळवारी ईडीने कोळसा घोटाळा आणि गाय तस्करी प्रकरणात अटक केली आहे. Coal Scam: Trinamool leader Vinay Mishra’s brother arrested by ED, action against Mamatas relative Abhishek Banerjee inevitable!


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : अंमलबजावणी संचालनालयाने कोळसा घोटाळ्याप्रकरणी तृणमूल नेते विनय मिश्रा यांच्या भावाला अटक केली आहे. विनय मिश्रा हे ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. विनय मिश्रा यांचे भाऊ विकास मिश्रा यांना मंगळवारी ईडीने कोळसा घोटाळा आणि गाय तस्करी प्रकरणात अटक केली आहे.

विनय मिश्राविरुद्ध ओपन वॉरंट मिळाल्यानंतर आता सीबीआयने रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. त्यांच्यावर कोळसा आणि गाय तस्करीत गुंतल्याचा आरोप आहे. असा आरोप आहे की, विनय मिश्रा तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा दुवा म्हणून काम करत असत. या प्रकरणात सीबीआयने अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी आणि त्यांच्या नातेवाइकांची चौकशी केली आहे.आरोपी विनय मिश्रा फरार

विनय मिश्रा मध्य पूर्वेत कोठेतरी दडून बसल्याचे सीबीआयचे मत आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार सीबीआयने विनय मिश्राविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. विनय मिश्राचे नाव काही महिन्यांपूर्वी उघडकीस आले होते, जेव्हा विनय मिश्रा ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी निकटवर्तीय असून अवैध धंद्यातील पैशांचा व्यवहार पाहतात, असा आरोप भाजपने केला होता. सीबीआयने विनय मिश्रा यांच्या घरावर अनेकदा छापे टाकले आहेत. विनय मिश्रा यांच्या संस्थेवरही छापे टाकण्यात आले आहेत. मात्र, आतापर्यंत सीबीआयला विनय मिश्राला पकडता आलेले नाही.

सीबीआयची चौकशी सुरू

या तस्करी प्रकरणाची तार यूथ तृणमूल कॉंग्रेसचे सरचिटणीस विनय मिश्रा यांच्यापर्यंत पोहोचली. पशू तस्करी आणि अवैध कोळसा खाण प्रकरणात 31 डिसेंबर 2020 रोजी कोलकाता येथे विनय मिश्राविरोधात शोध मोहीमही राबविण्यात आली. विनय मिश्राविरोधात तपास यंत्रणेने लूक आऊट परिपत्रक जारी केले होते. परंतु परिपत्रकाच्या सूचनेनंतर विनय मिश्रा फरार झालेला आहे.

Coal Scam: Trinamool leader Vinay Mishra’s brother arrested by ED, action against Mamatas relative Abhishek Banerjee inevitable!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*