मुख्यमंत्री म्हणतात, हिंदुत्वाची मक्तेदारी भाजपची नाही; सामना म्हणतो, हिंदुत्वाची जबाबदारी योगींची देखील

विशेष प्रतिनिधी

मुंबई : केवळ शेतकरी आंदोलनावर घेण्याच्या भूमिकेवरूनच नाही, तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही शिवसेना कन्फ्यूज्ड आहे. हिंदुत्वावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आणि सामनाची परस्पर विरोधी विधाने समोरासमोर आली आहेत.CM uddahav thackeray taunts BJP over hindutva issue

एकीकडे हिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपकडे नाही. देशातील सद्य:स्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसते. जनता पर्याय शोधू लागते तेव्हा तो निर्माणही होतो, असे सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिन कार्यक्रमात केले. तर दुसरीकडे आज सामनात, शरजील उस्मानीच्या विषयावर भाजपला सुनावताना हिंदुत्वविरोधी फॅक्टरी उत्तर प्रदेशात चालते. त्याची जबाबदारी योगींची आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.‘लोकसत्ता’च्या ७३ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की ‘‘मी अयोध्येला गेलो तेव्हाच स्पष्ट केले होते, की भाजपपासून दूर गेलो आहे, हिंदुत्वापासून नाही. हिंदुत्वाचे ‘पेटंट’ भाजपने घेतलेले नाही; पण शिवसेना महाराष्ट्रापुरती राहिल्याने दरम्यानच्या काळात हिंदुत्वाचा पर्याय उभा करण्याबाबत देशात एक पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्याची गरज आहे. एखादा पक्ष ती एकटा भरून काढेल किंवा काही जण एकत्र येऊन भरून काढतील; पण आता पर्याय हवा असे लोकांना वाटू लागले असून, लोकांना वाटते तेव्हा पर्याय उभा राहतो,’’ असे विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात देशात नवी समीकरणे उदयाला येऊ शकतात, असे सूचित केले.

त्याचवेळी पुण्याच्या एल्गार परिषदेत हिंदू समाजाविरोधात गरळ ओकून निघून गेलेला शरजील उस्मानीवर महाराष्ट्रात प्रक्षोभ उसळल्यानंतर गुन्हा दाखल केला. पण तोपर्यंत तो महाराष्ट्रातून निघून गेला होता. त्यावरून सामनाने भाजप, योगी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर दुगाण्या झाडल्या आहेत. हिंदुत्वविरोधी फॅक्टरी उत्तर प्रदेशातून चालते. तेव्हा तिची जबाबदारी योगी सरकारची आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्याकडे लक्ष द्यावे. लाखो हिंदू शेतकरी रस्त्यावर आहेत.

त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, असा उपदेश केला. पण योगी सरकारने लव्ह जिहादविरोधात कायदा केला. अतिक अहमद, मुख्तार अन्सारी, शबीर अहमद आदी गुंडांविरोधात कायद्याचा बुलडोझर चालवून त्यांची साम्राज्ये जमीनदोस्त केली, ७४८ कोटी रूपयांची मालमत्ता उद्धवस्त केली त्याचा मागमूसही सामनाच्या अग्रलेखात नाही. उलट शरजील इथून पळून निघून गेल्याची जबाबदारी सामनाने योगींवर टाकण्याचा उद्योग केला आहे.

CM uddahav thackeray taunts BJP over hindutva issue

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*