तमिळनाडूतील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री पलानीस्वामींची १२ हजार कोटींच्या कर्जमाफीची अनोखी गिफ्ट

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूतील अण्णाद्रमुक सरकारने आतापासून पावले टाकायला सुरुवात केली आहे. राज्य सरकारने आज तब्बल १२ हजार ११० कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. CM Palaniswamis unique gift of 12000 crore loan waiver to farmers in Tamil Nadu

जयललिला यांच्या मृत्यूनंतर यावेळी प्रथमच अण्णा द्रमुक निवडणुकीला सामोरे जाणार आहे. मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांना याची चांगलीच जाणीव आहे. त्यामुळेच त्यांनी शेतकऱ्यांना खुष करण्यासाठी आजचे हे पाउल उचलले आहे.त्यांच्या या निर्णयाचा लाभ सहकारी बँकांकडून कर्ज घेतलेल्या तब्बल १६.४३ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी आज विधानसभेत बोलताना ही घोषणा केली. तत्काळ ही योजना लागू होणार असून त्यासाठी अतिरिक्त तरतूदही करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

CM Palaniswamis unique gift of 12000 crore loan waiver to farmers in Tamil Nadu

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*