ममतांनी आग्रहाने हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतला; एसएसकेएम हॉस्पिटलचा खुलासा; तृणमूळच्या नेत्यांचे निवडणूक आयोगाला निवेदन, भाजपकडे अंगुलीनिर्देश

वृत्तसंस्था

कोलकाता : मी लवकरच तुमच्या भेटीला येईन, असे आश्वासन मतदारांना देणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतःच्या आग्रहाने हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतला. डॉक्टरांनी त्यांना सात दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.CM Mamata Banerjee has responded well to the treatment. She has been discharged with appropriate instructions

मुख्यमंत्र्यांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. मात्र, त्यांनी हॉस्पिटल अधिकाऱ्यांकडे लवकर डिस्चार्ज देण्याचा आग्रह धरला. त्यानुसार त्यांना योग तो वैद्यकीय सल्ला देऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. सात दिवसांनी त्यांची पुन्हा तपासणी करण्यात येईल, असा खुलासा एसएसकेएम हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.ममतांनी यापूर्वीच हॉस्पिटल बेडवरून एक विडिओ संदेश देऊन बंगालच्या जनतेला शांततेचे आवाहन करून आपण पुन्हा सेवेला हजर होण्याचे आश्वासन दिले होते.

तत्पूर्वी, तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी ममतांवरील हल्ल्यामागे खूप खोलवर रूजलेले कारस्थान असल्याचे निवेदन निवडणूक आयोगाला दिले आहे. यात कोणत्याही पक्षाचे अधिकृतपणे नाव घेतले नसले, तरी त्यांचा अंगुलीनिर्देश भाजपच्या नेत्यांकडे आहे.

कारण तृणमूळच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात काही दिवसांपूर्वीपासूनचा घटनाक्रम दिला आहे.राज्याच्या पोलिस महासंचालकांची बदली होणे, भाजप नेते दिलीप घोष यांनी विशिष्ट ट्विट करणे, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी काही घटना घडणे हे नेहमीचे राजकारण नव्हते, असा दावा तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात केला आहे.

CM Mamata Banerjee has responded well to the treatment. She has been discharged with appropriate instructions

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*