बाजवा यांनी शांततेच्या गप्पा मारण्यापेक्षा पाकि दहशतवाद्यांवर करावी कारवाई

विशेष प्रतिनिधी

चंडीगड – पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी शांततेच्या गप्पा मारण्यापेक्षा पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर कारवाई करावी, असा उपरोधीक सल्ला पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी दिला आहे. CM Amrindar singh lashes on Pakistan

पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याने उभय देशांतील संबध सुरळीत होण्याऐवजी अडथळे येत आहेत असे सांगत. अमरिंदर सिंग म्हणाले, बाजवा यांनी अगोदर आयएसआयच्या कुरापतींवर अंकुश ठेवायला हवा आणि त्यानंतरच भारत-पाकिस्तान यांच्यातील स्थीर संबंधाबाबत बोलायला हवे.पाकिस्तानबाबत भारत कधीही नरमाईचे धोरण अवलंबणार नाही. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई करत नाही, तोपर्यंत चर्चा सुरू होऊ शकत नाही. सीमेपलिकडून अजूनही घुसखोरी सुरूच आहे.

दररोज भारतीय जवान हुतात्मा होत आहेत. पाकिस्तानातून दररोज ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये शस्त्रे आणि अंमली पदार्थाची तस्करी केली जात आहे. दररोज सीमेवर कुरापती केल्या जात आहेत. या कारवाया थांबवायला हव्यात.

CM Amrindar singh lashes on Pakistan

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*