सॅल्युट तो बनता है!

  • लेक डिएसपी; इन्स्पेक्टर बाबांच्या डोळ्यात पाणी आणि उरात अभिमान…

विशेष प्रतिनिधी

तिरुपती : स्वतःच्याच मुलीला आपल्या पेक्षा उच्च पदावर पाहून कोणत्याही बाबाचा उर अभिमानाने भरून नाही आला तर नवलचं.त्यातल्या त्यात प्रशासकीय सेवेत असणार्या बाबाला जर आपली मुलगी सुद्धा अधिकारी वेषात आणि ते देखील आपल्या पेक्षा उच्च पदावर दिसली तर कडक सॅल्युट तो बनता है! circle inspector shamsunder salute his own  daughter

आपल्या मुलांनी खूप मोठे व्हावे अशी प्रत्येकाच्या आई-बाबांची इच्छा असते. स्पप्न पुर्ण करण्यासाठी मुले सर्वस्व पणाला लावून आपल्या ध्येयाचा पाठलाग करतात. जेव्हा ते स्वप्न पुर्ण होते तेंव्हा त्या मुलांपेक्षा त्यांच्या आई-बाबांचाआनंद गगनात मावत नाही. अशाच प्रकारे एका कन्येने आपले ध्येय पुर्ण केले आणि तिच्या यशाला वडिलांनी एक कडक सॅल्यूट मारला आहे.

आंध्र प्रदेशमधील पोलीस निरीक्षक श्याम सुंदर यांनी डिएसपी पदावर असलेल्या मुलीला म्हणजेच जेसी प्रशांती यांना पाहताच अभिमानाने सॅल्यूट केला. आता बाप-लेकीचा हा इतका सुंदर क्षण टिपल्याशिवाय थोडीच राहिला असता.हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

प्रशांतीचे वडील श्याम सुंदर तिरुपती कल्याणी डेम पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. आंध्र प्रदेश पोलिसांनी तिरुपती येथे ३ जानेवारी २०२१ रोजी पोलिस ड्यूटी मीट २०२१ कार्यक्रम आयोजित केला होता.

circle inspector shamsunder salute his own  daughter

दरम्यान, या कार्यक्रमात मुलीच्या वडिलांनी मुलीला केलेले सॅल्युट पाहून अधिकारी देखील भावुक झाले होते. आंध्र प्रदेश पोलिसांच्या पोलीस इन्स्पेक्टर श्याम सुंदर याच पोलीस मेळाव्यात आपली ड्युटी करत होते. त्याच वेळी मुलगी प्रशांती त्यांना दिसली तिला पाहता क्षणी त्यांनी सॅल्युट केला आणि उपस्थित सर्वांनी हा क्षण कायमचा डोळ्यात साठवून घेतला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*