रामाच्या मूर्ती तोडफोडप्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश

  • आंध्र प्रदेश सरकार वठणीवर

विशेष प्रतिनिधी

हैदराबाद : रामनाथतीर्थम मंदिरातील भगवान श्री रामाच्या प्राचीन मूर्तीची तोडफोड केल्याच्या घटनेची सीआयडी चौकशी करण्याचे आणि मंदिराचे आधुनिकीकरण करण्याचे आदेश आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी अखेर दिले आहेत. CID inquiry into the desecration of Lord Ram idol in Ramateertham

या संदर्भात अधिक माहिती देताना राज्याचे वित्तमंत्री वेल्लंपल्ली श्रीनिवास राव यांनी सांगितले की, मंदिरात एक नवीन मूर्ती स्थापित केली जाईल.


आंध्रात हिंदू मंदिरांवरील हल्ले सुरूच; राजमुंद्री मंदिरातील सुब्रमण्यम स्वामी मूर्ती फोडली; जगन मोहन रेड्डी सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष; हिंदू संतप्त


आंध्र प्रदेशात गेल्या काही महिन्यांपासून मंदिरावर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. समाजकंटकांनी मंदिरावर हल्ले चढवून मूर्ती तोडण्याचे सत्र सुरू केले होते. याविरोधात हिंदुत्ववादी आणि तेलगू देशम पक्षाने तीव्र संताप व्यक्त करून आंदोलन आणि सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर जागे झालेल्या सरकारने आदेश दिले होते.

CID inquiry into the desecration of Lord Ram idol in Ramateertham

काही लोक घाबरत नाहीत किंवा देवाची भक्ती करीत नाहीत. ते मूर्तींबरोबर राजकारण आणि भयंकर खेळ खेळत आहेत. ते मूर्तींची तोडफोड करीत आहेत आणि त्याचा आळ आमच्यावर घालत आहेत. ते जाती-धर्म-द्वेष पसरवत आहेत, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*