संजय राठोडांविरुध्द आवाज उठवित असल्यानेच सरकारकडूनच चित्रा वाघ यांची बदनामी, सुधीर मुनगंटीवार यांचा आरोप

पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या विरुध्द लढा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांचा फोटो मॉर्फ करण्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. चित्रा वाघ या आवाज उठवत असल्याने सरकार त्यांना बदनाम करत आहे, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे. Chitra Wagh slandered by government for raising voice against Sanjay Rathore, Sudhir Mungantiwar accused


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या विरुध्द लढा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांचा फोटो मॉर्फ करण्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. चित्रा वाघ या आवाज उठवत असल्याने सरकार त्यांना अशा प्रकारे बदनाम करत असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, चित्रा वाघ या आवाज उठवित असल्याने त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी त्यांना अशा प्रकारे बदनाम करण्यात येत आहे. त्यांना बदनाम करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारची खोटीनाटी चित्रे प्रसारित केली जात आहेत. हा महाराष्ट्राचा अवमान आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी .मुनगंटीवार म्हणाले की, ज्यांच्यासोबत आपण फोटो काढला, त्यांच्यासोबत आपण संभाषण करतो. त्यांना सोन्याची अंगठी देतो, तांब्या-पितळेची नाही. यामुळे संशय निर्माण होतो. याची चौकशी करून हा संशय दूर केला गेला पाहिजे. जर निर्दोष असेल तर कारवाई होता कामा नये आणि तर यात दोषी आढळला तर मात्र कारवाई झाली पाहिजे. मात्र, चौकशी होईपर्यंत संजय राठोड यांनी राजीनामा दिला पाहिजे.

आम्ही मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावतो. तसेच विधान भवनात जाताना आम्ही शिवरायांचं दर्शन घेतो आणि विधानभवनात प्रवेश करतो. ते कशासाठी, तर आम्ही महाराजांना विश्वास देतो की तुमच्या या रयतेच्या राज्यात तुम्ही जरी नसलात तरी देखील तुमचा विचार आम्हाला दिशा देतो. कोणत्याही महिलेवर जर अन्याय झाला, अत्याचार झाला तर अशा व्यक्तीची अवस्था आम्ही या रयतेच्या राज्यात रांज्या पाटलाची झाली तशीच करू ही भावना त्या मागे असते, असा घणाघात मुनगंटीवार यांनी केला.

Chitra Wagh slandered by government for raising voice against Sanjay Rathore, Sudhir Mungantiwar accused

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*