औरंगाबादेतील बलात्काऱ्याला ठाकरे-पवार सरकारचे संरक्षण, चित्रा वाघ यांची टीका

औरंगाबाद येथील अत्याचाराच्या घटनेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी संशयित आरोपी आहेत. पोलिसांकडून अद्याप आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे पिडीतांना मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे तातडीने आरोपींना अटक करावी, अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केली. Chitra Wagh criticizes Thackeray-Pawar government’s protection of rapist in Aurangabad


विशेष प्रतिनिधी

मुंबई : औरंगाबाद येथील अत्याचाराच्या घटनेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी संशयित आरोपी आहेत. पोलिसांकडून अद्याप आरोपीला अटक झालेली नाही. त्यामुळे पिडीतांना मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे तातडीने आरोपींना अटक करावी, अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केली.

वाघ म्हणाल्या की, औरंगाबाद येथील एका महिलेने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर फिर्याद दाखल केली आहे. मात्र, पोलिसांकडून अजूनही संबंधित आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत असून पिडीत महिलेचे मनोबल खचत आहे. पोलिस अजून तपास सुरु असल्याचे सांगून आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोकांनी पिडीत महिलेची फिर्याद सोशल मिडियावर व्हायरल केली. अशा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच संबंधित आरोपीला अटक करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.नोकरी लावण्याच्या आमिषाने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांनी एका उच्चशिक्षीत तरुणीवर कारमध्ये अत्याचार केल्याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जकात नाका भागात राहणारी एक तरुणी घरात मुलांचे ट्युशन घेऊन उदरनिर्वाह चालवित होती.

Chitra Wagh criticizes Thackeray-Pawar government’s protection of rapist in Aurangabad

बीड बायपास रोड येथे ट्युशनसाठी खोली पाहण्यासाठी गेलेल्या या तरुणीची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्याशी ओळख झाली. मेहबूब शेख यांनी नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणीशी ओळख वाढवली व जवळीक साधली. मुंबईला जाण्याच्या नावाखाली तिला शहरातील एका निर्मनुष्य भागात नेत अत्याचार केला. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून मेहबूब शेखविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*