चिराग पासवान, मायावती यांना झटका, बिहारमधील एकमेव आमदारांनी पक्ष सोडून संयुक्त जनता दलात केला प्रवेश


बिहार विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सर्वाधिक त्रास देणाऱ्या चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला चांगलाच झटका बसला आहे. लोकजनशक्तीच्या एकमेव आमदाराने नितीश कुमार यांच्या नेतृत्वाची स्तुती करत संयुक्त जनता दलात प्रवेश केला आहे.


विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सर्वाधिक त्रास देणाऱ्या चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला चांगलाच झटका बसला आहे. लोकजनशक्तीच्या एकमेव आमदाराने नितीश कुमार यांच्या नेतृत्वाची स्तुती करत संयुक्त जनता दलात प्रवेश केला आहे. Chirag Paswan, Mayawati shocked, the only MLA from Bihar left the party and joined the Samyukta Janata Dal

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची साथ सोडून चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. आपला विरोध भाजपाला नसून नितीश कुमार यांना असल्याचे त्यांनी सांगितले होते.भाजपाच्या उमेदवारांविरुध्द त्यांनी निवडणूक लढविली नव्हती. मात्र, संयुक्त जनता दलाच्या सर्व उमेदवारांविरुध्द आव्हान उभे केले होते. त्यांच्या पक्षाचा एकच आमदार निवडून आला तरी संयुक्त जनता दलाचे अनेक उमेदवार त्यांच्यामुळे पडले. मात्र, आता निवडून आलेल्या राजकुमार सिंह या एकमेव आमदाराने संयुक्त जनता दलात प्रवेश केला आहे. बहुजन समाज पक्षाचे एकमेव आमदार जामा खान यांनीही जेडीयूूत प्रवेश केला आहे. नितीश कुमार हे द्रष्टे नेते असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Chirag Paswan, Mayawati shocked, the only MLA from Bihar left the party and joined the Samyukta Janata Dal

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था