चिनी विषाणू साथीच्या खर्चासाठी महापालिकांना जास्त अनुदान द्या


  • माजी मुख्यमंत्री फडणवीस यांची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ”महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने कोविड साथीचा सर्व खर्च स्वत: उचलू शकत नाहीत. राज्य शासनाने 7 -8 कोटी रुपये दिले असले तरी ते अपुरे आहेत. त्यामुळे महापालिकांना जास्तीत जास्त अनुदान राज्य सरकारने द्यावे,” अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली.

फडणवीस यांनी मीरा भाईंदरला भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार रविंद्र चव्हाण, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, सभागृह नेते रोहिदास पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आदी यावेळी उपस्थित होते.

फडणवीस यांनी मीरा भाईंदरमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्युचे प्रमाण जास्त असल्याने त्यावर नियंत्रण करणे व व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

कोरोना उपचाराच्या व्यवस्था सुधारण्याची गरज फडणवीस यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, यंत्रणामध्ये समन्वयाचा अभाव असून चाचण्यांची तपासणी दुप्पट केली पाहिजे. चाचण्यांचे अहवाल 24 तासात आले पाहिजेत. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी देखील एकास 20 झाली तर प्रसार रोखता येईल.

पालिका आयुक्त सांगतात की खाटा उपलब्ध आहेत. पण एक महिला अशी भेटली ज्यांच्या पतीला रुग्णालयात 10-12 तास दाखल करुन घेतले नाही आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. एका पत्रकारास लक्षणे असुन देखील रुग्णालयात दाखल केले गेले नाही. पालिकेकडे जागा आहे आणि लोकांना जागा मिळत नसेल तर हे बरोबर नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करुन यंत्रणा उभारा असे आयुक्तांना सांगीतले आहे.

“पालिकेच्या अलगीकरण कक्षात देखील वेळेवर जेवण मिळत नाही, स्वच्छता नाही आदी तक्रारी आहेत. मनुष्यबळाची कमतरता असुन ती दुर करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. खाजगी रुग्णालयातुन जास्त शूल्क वसुल केले जात असल्या बद्दल आयुक्तांनी समिती नेमुन बिलांचे ऑडिट करण्याचे आश्वासन दिले आहे,” असे फडणवीस म्हणाले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती