चीनी व्हायरसवर आयुष मंत्रालयाचे आयुष ६४ औषध

चीनी व्हायरसवर केंद्र सरकारने काही आयुर्वेदिक औषधांची क्लिनिकल ट्रायल घेतली आहे. यापैकी काही औषधे चीनी व्हायरसवर उपचारासाठी परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आयुष मंत्रालयाने आयुष 64 औषध वापरण्याचा सल्ला दिला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरसवर केंद्र सरकारने काही आयुर्वेदिक औषधांची क्लिनिकल ट्रायल घेतली आहे. यापैकी काही औषधे चीनी व्हायरसवर उपचारासाठी परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आयुष मंत्रालयाने आयुष 64 औषध वापरण्याचा सल्ला दिला आहे.

चीनी व्हायरसवर रुग्णांवर उपचारासाठी आयुष मंत्रालयाने आयुष 6४ औषध वापरण्याचा सल्ला दिला आहे. लक्षणे न दिसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी आयुष 64 हे 500 मिलिग्रॅम औषध दिवसातून दोनदा कोमट पाण्यातून घ्यावं. 15 दिवस किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हे औषध घ्यावं, असं आयुष मंत्रालयाने सांगितले. याशिवाय कोरोनाची लक्षणं नसलेले किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांनी अश्वगंधा आणि गुळवेलचं नियमित सेवन करावं, असा सल्लाही सरकारने दिला आहे.

चीनी व्हायरसमधून बरे झाल्यानंतर अश्वगंधाचा 500 मिलीग्रॅम रस किंवा एक ते तीन ग्रॅम पावडर दिवसातून दोन वेळा कोमट पाण्यातून घ्यावी. हा उपाय 15 दिवस किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार करावा. डॉक्टारंच्या काय आणि कशी काळजी घ्यावी हेदेखील सराकरनं सांगितलं आहे. याशिवाय दिवसातून एकदा कोमट पाणी किंवा दुधातून च्यवनप्राश घ्यावं.

चीनी व्हायरसपासून बचाव करण्यासाठी किंवा धोका टाळण्यासाठी काय करावे याबाबतही सरकारने उपाययोजना दिल्या आहेत. दिवसभर गरम पाणी प्या, ताजे आणि गरम अन्न खा, व्यायाम आणि योगा करा, हर्बल टी प्या, नाकात खोबरेल किंवा तिळाचं तेल लावा. कोरडा खोकला असल्यास पाण्यात पुदिन्याची ताजी पाने किंवा ओवा टाकून उकळून घ्या आणि दिवसातून एक वेळा या पाण्याची वाफ घ्या. खोकला आणि घशात खवखव असेल तर दिवसातून दोन-तीन वेळा साखर किंवा मधासोबत लवंग पावडर मिसळून घ्या, असे सरकारने सांगितलं आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*