हाँगकाँगमध्ये चिनी राजवटीची हुकूमशाही सुरुच, लोकप्रिय रेडिओ जॉकी वॅन यिऊ-सिंग यांना अटक


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हाँगकाँगमध्ये लोकप्रिय रेडिओ जॉकी वॅन यिऊ-सिंग यांना अटक करण्यात आली आहे. चीनवर टीका केल्याब्द्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. अशाप्रकारे लोकशाहीची तसेच मानवी हक्काची पायमल्ली करण्याचे चिनी राजवटीचे धोरण अजूनही तसेच सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. Chinese dictatorship continues in Hong Kong popular radio jockey Wan Yiu-Singh arrested

वॅन हे ५२ वर्षांचे आहेत. डीजे म्हणून मिळालेल्या गिग्ज हे टोपणनावाने ते प्रसिद्ध आहेत. सरकारविरोधी निदर्शनांबाबत चर्चा करणाऱ्या कार्यक्रमांचे त्यांनी आयोजन केले आहे. तैवानला पलायन करावा लागलेल्या हाँगकाँगच्या तरुणांना पाठिंबा देण्यासाठी निधी जमविण्याचे आवाहन त्यांनी केले होते. वॅन यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक झाली होती. त्यावेळी नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा भंग केल्यामुळे त्यांच्यासह शंभर जणांना गजाआड करण्यात आले होते.तेव्हा त्यांनी तैवानमधील हाँगकाँगच्या नागरिकांसाठी गोळा करण्यात आलेल्या निधीचा बेकायदा व्यवहार केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला होता. आता अटक झाल्यानंतर त्यांच्यावर अद्याप आरोप ठेवण्यात आलेला नाही.

सरकारी अधिकाऱ्यांच्या मते लोकशाहीवादी नागरिकांच्या आंदोलनातील लोकप्रिय घोषणा म्हणजेच देशद्रोह. हाँगकाँग मुक्त करा, आमच्या काळाची क्रांती हीच, पोलिस दल बरखास्त करा अशा घोषणा आंदोलक देत असतात.

Chinese dictatorship continues in Hong Kong popular radio jockey Wan Yiu-Singh arrested

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती