चिनी अब्जाधीश जॅक मा दोन महिन्यांपासून बेपत्ता, चिनी राष्ट्राध्यक्षांशी वाद भोवला!

चीनमधील ईकॉमर्स इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवणारे जॅक मा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या वादानंतर गेल्या दोन महिन्यांपासून कुठेच दिसलेले नाहीत. सरकारविरोधात बोलणाऱ्यांना चीनमध्ये नेहमीच दडपण्यात आले आहे. Chinese billionaire Jack Ma has been missing from two months


विशेष प्रतिनिधी

बीजिंग : चीनमधील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे अब्जाधीश आणि अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. चीनमधील ईकॉमर्स इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवणारे जॅक मा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या वादानंतर गेल्या दोन महिन्यांपासून कुठेच दिसलेले नाहीत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शांघाय येथे झालेल्या भाषणात जॅक मा यांनी चीनच्या आर्थिक नियामक आणि सरकारी बँकांवर कडाडून टीका केली होती.

जगभरातील कोट्यावधी उद्यमींसाठी एक आदर्श म्हणून ओळखले जाणारे जॅक मा यांची भाषणेही खूप प्रसिद्ध आहेत. गत वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी सरकारला व्यवसायातील सुलभीकरणात खोडा घालणाऱ्या पद्धतीत बदल करण्याचे सुनावले होते. त्यांनी जागतिक बँकिंग नियमांना ‘जुनाट लोकांचा क्लब’ म्हटले. या भाषणानंतर चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी भडकली होती. कम्युनिस्ट पक्षावर हल्ला म्हणून जॅक मा यांच्यावर टीकाही करण्यात आली. यानंतर जॅक मा यांच्या संकटांना सुरुवात झाली आणि त्यांच्या व्यवसायावर विलक्षण निर्बंधही लादले गेले.नोव्हेंबरमध्ये चिनी अधिकाऱ्यांनी जॅक मा यांना मोठा धक्का दिला आणि त्यांच्या अँट ग्रुपचा 37 अब्ज डॉलर्सचा आयपीओ निलंबित केला. वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालानुसार जॅक माच्या अँट ग्रुपचा आयपीओ रद्द करण्याचा आदेश थेट चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून आला होता.

Chinese billionaire Jack Ma has been missing from two months

सरकारविरोधात बोलणाऱ्यांना चीनमध्ये नेहमीच दडपण्यात आले आहे. आवाज दाबण्यात आलेले जॅक मा हे पहिले नाहीत. कम्युनिस्ट पार्टी किंवा शी जिनपिंग सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*