अबब, तब्बल २४६ अब्ज डॉलर खर्चुन चीनने ७७ कोटी लोकांना काढले गरिबीच्या खाईतून बाहेर?

विशेष प्रतिनिधी

बिजिंग : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज ऐतिहासिक घोषणा करताना देशाने गरिबीविरोधातील युद्ध जिंकल्याचे जाहीर केले. मागील चार दशकांच्या काळामध्ये आमच्या सरकारने ७७ कोटी जनतेला गरिबीच्या खाईतून बाहेर काढले असून सरकारचे कृत्य हे जादू असून इतिहास देखील त्याची नोंद घेईल असा विश्वाहस त्यांनी व्यक्त केला. China wining battle against poverty by lifting 77 crore out of it

चीनमध्ये सत्तरच्या दशकामध्ये सुधारणेचे वारे वाहू लागले त्यानंतर ७७ कोटी लोक गरिबीच्या खाईतून बाहेर पडले. जागतिक पातळी गरिबीच्या निर्मूलनामध्ये चीनचे योगदान हे सत्तर टक्के आहे. मागील आठ वर्षांच्या काळामध्ये केवळ गरिबी निर्मूलनावर चीनने १.६ ट्रिलियन युआन (२४६ अब्ज डॉलर) खर्च केले आल्याचे त्यांनी सांगितले.संयुक्त राष्ट्रसंघाने गरिबी निर्मूलनासाठी २०३० ची डेडलाईन ठरवून दिली होती पण आम्ही दहा वर्षे आधीच हे ध्येय पूर्ण केले आहे. देशातील ८३२ काउंटी आणि १ लाख २८ हजार गरीब खेडी ही श्रीमंत झाली असल्याचा दावा जिनपिंग यांनी केला. ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारून एक संपन्न समाज तयार करण्याचे आमचे ध्येय असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

Students wave Chinese national flags as they watch a street parade during the opening of the 67th Miss World Final in Sanya in China’s southern Hainan province on November 7, 2017. / AFP PHOTO / STR / China OUT (Photo credit should read STR/AFP/Getty Images)

China wining battle against poverty by lifting 77 crore out of it

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*