चीनचे वर्चस्व मोडून काढण्याचा क्वाड देशांचा निर्धार

जपानची राजधानी टोकियो येथे झालेल्या क्वाड देशांच्या बैठकीत चीनचे वर्चस्व मोडून काढण्याचा निर्धार व्यक्त केला. अप्रत्यक्षपणे चीनला लक्ष्य करीत नियमबद्ध जागतिक व्यवस्थेची अपेक्षा व्यक्त केली. सदस्य देशांची प्रादेशिक एकता आणि सार्वभौमत्व यांचा मान राखून सध्याच्या वादांवर शांततामय तोडगा काढण्याचे आवाहन केले.


विशेष प्रतिनिधी

टोकियो : जपानची राजधानी टोकियो येथे झालेल्या क्वाड देशांच्या बैठकीत चीनचे वर्चस्व मोडून काढण्याचा निर्धार व्यक्त केला. अप्रत्यक्षपणे चीनला लक्ष्य करीत नियमबद्ध जागतिक व्यवस्थेची अपेक्षा व्यक्त केली. सदस्य देशांची प्रादेशिक एकता आणि सार्वभौमत्व यांचा मान राखून सध्याच्या वादांवर शांततामय तोडगा काढण्याचे आवाहन केले.

नोव्हेंबर २०१७ मध्ये चार देशांनी एकत्र येऊन क्वाड गट तयार केला होता. त्यात इंडो-पॅसिफिक मध्ये चीनचे वर्चस्व हटवण्याचा हेतू होता. या चार देशात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान व भारत यांचा समावेश आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक न्यूयॉर्कमध्ये झाली होती. दुसरी बैठक टोकियोमध्ये झाली.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी व ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मॅरिस पायने यामध्ये सहभागी झाले आहेत. एस. जयशंकर यांनी मंगळवारी अमेरिकेचे समपदस्थ माइक पॉम्पिओ यांच्याशी जपानमधील टोक्यो येथे विविध द्विपक्षीय प्रश्नांवर चर्चा केली. त्यात इंडो-पॅसिफिक भागातील स्थिरतेच्या प्रश्नाचा समावेश होता. क्वाड्रिलॅटरल म्हणजे चार देशांच्या आघाडीची बैठक जपानमध्ये होत असून त्या निमित्ताने त्यांच्यात चर्चा झाली.

जयशंकर म्हणाले की, वैविध्यपूर्ण व मूल्याधिष्ठित लोकशाही देश म्हणून या गटातील देशांना मुक्त, खुल्या व सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक भागाचे महत्त्व (एफओआयपी) अधिक आहे. नियमाधिष्ठित आंतरराष्ट्रीय व्यवस्था महत्त्वाची असून आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीत स्वातंत्र्य, प्रादेशिक एकात्मता व सार्वभौमत्व या मुद्यांना महत्त्व देतानाच सर्व वाद शांततामय तोडगा काढून मिटवले पाहिजेत. इंडो-पॅसिफिक संकल्पनेला व्यापक मान्यता मिळत आहे, ही समाधानाची बाब आहे. क्वाड देशांच्या कायदेशीर आर्थिक व सुरक्षा हितासाठी आम्ही बांधील आहोत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*